बारामती, ता. १८ : पोलिस असल्याची बतावणी करून एका ज्येष्ठ नागरिकाकडील साडेतीन लाखांच्या सोन्याच्या अंगठ्या व गळ्यातील चेन, असा ऐवज दोन भामट्यांनी लंपास केला. सोमवारी (ता. १७) दुपारी चारच्या सुमारास धनेश सुझुकी शोरुमसमोर ही घटना घडली.
या प्रकरणी दिलीप बाबूराव जगदाळे (वय ६४, रा. सहयोगसोसायटी मागे, बारामती) यांनी बारामती शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. जगदाळे हे सोमवारी आपल्या टायरच्या दुकानातून दुपारी चारच्या सुमारास घरी निघाले असता धनेश सुझुकी शोरुमसमोर मोटारसायकलवरुन आलेल्या दोन भामट्यांनी त्यांना थांबविले, ‘एका मुलावर चाकूचे वार झाले असून आम्ही वार करणाऱ्यांना शोधत आहोत, आम्ही पोलिस आहोत, तुम्ही हातात अंगठ्या घालून कशाला फिरता, त्या रुमालात घालून खिशात ठेवा,’ असे सांगत हातचलाखीने अंगठ्या व गळ्यातील चेन चोरुन नेली. जगदाळे यांनी घरी आल्यानंतर रुमाल बघितला असता त्यात दोन दगड निघाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.