पुणे

बारामतीत मोबाईल कंपनीची ४७ लाख रुपयांची फसवणूक

CD

बारामती, ता. २५ : मोबाईल दुकानात विक्री करून त्याचे पैसे संबंधित मालकांना न दिल्याने शहर पोलिसांनी सूरज हरिश्र्चंद्र तावरे (रा. माळेगाव, ता. बारामती) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सृजल टेलिकॉमचे निक्सन बेन्नी म्हात्रे (रा. नडेनगर कॉलनी, काळेवाडी, पिंपरी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
या फिर्यादीत नमूद केले आहे की, सूरज तावरे याच्याकडे सृजल टेलिकॉम कंपनीने बारामतीतील सिनेमा रोडवरील दुकानात विक्रीसाठी मोबाईल दिलेले होते. त्याने मार्च २०२४ मध्ये सहा लाखांचे आयफोन, तसेच सॅमसंग कंपनीचे फोन विकले. विक्रीच्या सॉफ्टवेअरमध्ये छेडछाड करत ग्राहकांची खोटी नावे व कर्ज खाते क्रमांक तयार करून सृजल टेलिकॉमची फसवणूक केली. सप्टेंबर महिन्यात हिशेब केल्यानंतर नऊ मोबाईलचे पैसे जमा झाले नाही. त्यानंतर कंपनीच्या मालकांनी स्टॉकची पडताळणी केली असता आयफोन, सॅमसंग, नोकीया, ओपो, विवो या सारख्या कंपन्यांच्या एकूण ८८ मोबाईलचा हिशेब लागत नव्हता. या मोबाईलची विक्री करून त्याचे पैसे कंपनीकडे जमा केलेले नसल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी एकूण ३७ लाख व दुकान सुरु करताना दिलेले दहा लाख, अशी एकूण ४७ लाखांची फसवणूक झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : विदर्भात उष्णतेची लाट तर या भागांत अवकाळी पाऊस लावणार हजेरी, आज तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान ? जाणून घ्या

Pune Accident: नवले पूलनंतर पुन्हा भीषण अपघात! जांभूळवाडीत ट्रक धडकून चालकाचा मृत्यू

Latest Marathi Live Update: नाशिकमध्ये बोगस शालार्थ आयडी प्रकरणात घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता

Iran US Israel War : ‘होर्मुज’ला उत्तर ‘खार्ग’ने? बेट छोटं पण इराणच्या तेलसाम्राज्याचं हृदय... आता जगाला फटका बसणार?

PMPML Bus: ‘पीएमपी’त महिला असुरक्षित; ‘परिसर’चा अहवाल; ५७ टक्के प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण

SCROLL FOR NEXT