पुणे

बारामतीत मुलींना कर्करोगावरील लस मोफत देणार : अजित पवार

CD

बारामती, ता. २८ : ‘‘सध्या कर्करोगाचे प्रमाण वेगाने वाढत आहे, त्यातही महिलांमधील वाढता कर्करोग चिंताजनक आहे. त्याठी बारामती विधानसभा मतदारसंघातील नऊ ते पंधरा वर्षे वयोगटातील सर्व मुलींना अदर पूनावाला यांनी विकसित केलेली लस विनामूल्य दिली जाईल,’’ अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
बारामती येथील एका कार्यक्रमात शुक्रवारी (ता. २८) अजित पवार यांनी ही घोषणा केली. दरम्यान, बारामतीतील नवीन साठवण तलाव ते कुस्तीगीर संघाचे कार्यालय या दरम्यान नीरा डावा कालव्याशेजारील जागेत एक किलोमीटर लांबीची छोटी रेल्वे गाडी लहान मुलांसाठी तयार करणार असल्याचेही त्यांनी या प्रसंगी सांगितले. ते म्हणाले, ‘‘तीन हत्ती चौकातील पुलाचे काम केल्यानंतर माझ्यावर अनेकांनी टीका केली. यातील तज्ज्ञांना विचारून येथील रचना केली, पण ज्यांना यातील काही माहिती नाही, अशांनी येथे येऊन टीका केली.’’
बारामतीतील वाचनालय झाल्यानंतर जो वाचत नाही, तोही तिथे जाऊन वाचन करायला लागेल, अशी ही वास्तू करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘मी कामे करतो, तुम्ही बघा तरी’
शहरातील विविध विकासकामांचा उल्लेख करताना शेवटी अजित पवार गमतीने म्हणाले, ‘‘मी सगळी कामे करतोय, तुम्ही ती कामे जाऊन बघा तरी....चूक असेल ती निदर्शनास आणून दिल्यास तीही दुरुस्ती करेन.’’ या वर उपस्थितांत हशा पिकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मिसिंग लिंक बनला टुरिस्ट स्पॉट! फोटो काढण्यासाठी गाड्यांच्या लांबच लांब रांगा, व्हिडिओ व्हायरल; MSRDC चा प्रवाशांना इशारा

HSC Result: मुंबईतील १० शाळांचा निकाल शून्य टक्के, सर्व विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत नापास

Satara Crime: साताऱ्यात धक्कादायक प्रकार उघड; कॅफेमध्ये अल्पवयीनांसाठी ‘खास रूम’चा पर्दाफाश, कॅफे आडून गैरप्रकार!

Latest Marathi News Live Update : पुण्यातील तीन तरुणांचा पवना नदीत बुडून मृत्यू,

Pimpri Crime News: पिंपरीत बेकायदा गॅस रिफिलिंगचा स्फोटक धोका कायम; पोलिस कारवाईनंतरही ‘काळाबाजार’ सुरूच, जादा नफ्यासाठी जीवघेणा खेळ!

SCROLL FOR NEXT