पुणे

बारामतीतील शेतकरी पावसामुळे हैराण

CD

बारामती, ता. २५: मॉन्सूनपूर्व पावसाने बारामती शहर व तालुक्यात सर्वदूर जोरदार हजेरी लावली आहे. संपूर्ण पावसाळ्याच्या सरासरीच्या निम्मा पाऊस १ मेपासून नोंदविला आहे. शहरात पावसाची तीव्रता अधिक आहे. तालुक्यातील अनेक ओढे नाले दुथडी भरून वाहू लागल्याचे चित्र पावसाने निर्माण केले आहे. पाण्याअभावी पिकांची दुरवस्था होऊ नये. यासाठी झटणाऱ्या शेतकऱ्याला पावसाने दोनच दिवसांत हैराण केले.

चार दिवसांपूर्वीपर्यंत टंचाईच्या विषयावर काम करणाऱ्या यंत्रणेला चारच दिवसात पूरनियंत्रणाच्या बाबतीत कामाची वेळ आल्याचे चित्र प्रशासनाने अनुभवले. गेले तीन दिवस संततधार पावसाने बारामतीचे जनजीवन पार विस्कळित झाले आहे.पावसामुळे दुचाकीवरून घराबाहेर पडणे नागरिकांना अवघड झाले आहे. सध्या बारामतीत रस्त्यावर चार चाकी वाहनांची संख्या अचानकच वाढल्याचे दिसत आहे.

शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलेले असून तांदूळवाडी येथील सहा घरांमध्ये तर फलटण रस्त्यावरील काही घरांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याची माहिती समोर आली आहे. बारामती नगरपालिकेच्या वतीने तातडीची उपाययोजना हाती घेतल्याची माहिती मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी दिली. संततधार पावसाने काही इमारतींच्या बेसमेंटमध्ये पाणी साचून राहिले असून काही दुकानांमध्येही हे पाणी शिरले आहे.
दरम्यान, बारामती तालुक्यातील एकूण आठ मंडळात सरासरी २२६.८७ मिलिमीटर एकूण पर्जन्यमानाची नोंद झाली असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले आहे.


बारामतीत असा संततधार पाऊस क्वचितच पडतो. तीन दिवस झाले पाऊस थांबायचे नावच घेत नसल्याने याची बारामतीत मोठी चर्चा आहे. सातत्याने कोसळणाऱ्यानागरिकांना घराबाहेर पडणेच अवघड झाले आहे.

व्यापारपेठेवरही परिणाम.
शहरातील व्यापारपेठेतील दुकानदारांनी दुकाने उघडली खरी, मात्र पावसाने ग्राहकच नसल्याने व्यापारपेठेतही शुकशुकाट होता. हॉटेल व्यावसायिकांना एरवी शनिवार व रविवारी सुगीचे दिवस असतात, पावसाने त्यांच्या व्यवसायावरही विपरीत परिणाम जाणवला.


12741

.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Mock Drill: मॉक ड्रिलदरम्यान स्मोक ग्रेनेडचा स्फोट; अहिल्यानगरात चार पोलिस कर्मचारी जखमी, ग्रेनेडची पिन पडली अन् काय घडलं!

RCB vs GT, Qualifier 1 सामन्यावर पडणार पावसाचं पाणी? सामना रद्द झाला, तर कोण गाठणार फायनल? वाचा नियम

Devendra Fadnavis Onion Crop : कांदा उत्पादकांचा प्रश्न निकाली निघणार? देवेंद्र फडणवीसांनी केंद्रात केलं बैठकीचं आयोजन; विरोधकांवरही टीका

LPG Alternative India : महाग 'एलपीजी'ला पर्याय! नितीन गडकरी यांनी लॉंच केली स्वस्त आणि पर्यावरणपूरक इथेनॉल शेगडी

Everest Base Camp: दादांची शिकवण अन् लेकीची जिद्द; नयना बोऱ्हाडे यांची एव्हरेस्ट बेस कॅम्पवर दमदार कामगिरी

SCROLL FOR NEXT