पुणे

प्रचारात दिलेला शब्द प्रत्यक्षात उतरविणार

CD

बारामती, ता. २५ : ‘‘सभासदांना केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नीलकंठेश्वर पॅनेलच्या सर्व उमेदवारांना जे मताधिक्य दिले, त्यामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. प्रचारादरम्यान जो शब्द दिला होता, तो प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पुढील पाच वर्षात माझ्यासह प्रत्येक जण मनापासून कष्ट करेल. सभासदांच्या विश्वासाला कायम पात्र राहण्याचा आमचा प्रयत्न असेल,’’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री व नीलकंठेश्वर पॅनेलचे प्रमुख अजित पवार यांनी सभासदांची प्रती आभार व्यक्त केले.
माळेगाव कारखान्याच्या निवडणूक निकालाबाबत त्यांनी संपर्क साधला असता प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील एक अग्रगण्य कारखाना म्हणून माळेगाव कारखान्याची सातत्याने ओळख राहील, यासाठी आमचा कायमच प्रयत्न असेल. सभासदांना उत्तम भाव देण्यासोबतच या परिसराचा चेहरामोहरा बदलण्यासह अनावश्यक खर्च कमी करून भावात वाढ कशी करता येईल, याचा प्रयत्न आम्ही एकत्र बसून करू. सभासदांनी पाच वर्षांसाठी संधी दिली आहे. त्यामुळे माझ्यासह सर्वच नवनिर्वाचित संचालकांची जबाबदारी वाढली आहे. आर्थिक शिस्त लावण्यासह सर्वार्थाने या कारखान्याचा कायापालट कसा होईल याचा प्रयत्न मी व माझे सहकारी करू.’’

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये विविध राजकीय पक्षाचे सहकारी, कार्यकर्ते, पदाधिकारी, सभासद या सर्वांनीच विजयासाठी जिवाचे रान केलेले आहे, माझ्यासह माझ्या सर्व सहकाऱ्यांना त्यांच्या या प्रयत्नांची जाण असून आम्ही सगळे मिळून या कारखान्याचा कायापालट निश्चित करून दाखवू.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya: हार्दिक पांड्याविरोधात पुणे पोलिसात तक्रार; तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप

Cyber Crime : दहा कोटींच्या सायबर फसवणूकप्रकरणी सोलापूरमधून आरोपीला अटक

Monalisa Marriage: मुस्लिम तरुणासोबत लग्न केलं; पण वडिलांची भीती, घाबरलेल्या मोनालिसाची पोलिसात धाव अन्... व्हायरल गर्ल पुन्हा चर्चत

Latest Marathi News Update : आज कुठे काय घडलं? पाहा एका क्लिकवर...

स्वच्छता कंत्राटदारांना बसणार लगाम; आता नगरसेवकांच्या शिफारसीनंतरच मिळणार देयके, 'या' महानगरपालिकेचा मोठा निर्णय...

SCROLL FOR NEXT