बारामती, ता. २५ : श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत सोपानकाका महाराज पालखीचे गुरुवारी (ता. २६) बारामती नगर परिषद हद्दीत आगमन होणार असून, पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी नगर परिषद प्रशासन सज्ज झाले आहे, अशी माहिती मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी दिली आहे.
बारामती शहरात गुरुवारी पालखीचा मुक्काम शारदा प्रांगणात असून, येणाऱ्या वारकऱ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पालखी मार्गावरील रस्त्यांचे खड्डे भरणे, वारकरी पुतळा सुशोभीकरण, रस्त्यांची स्वच्छता, धूर फवारणी, सार्वजनिक शौचालय दुरुस्ती व स्वच्छता आदी कामे केली आहेत. शहरातील सर्व पथदिवे सुस्थितीत सुरु राहतील, तसेच स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत दक्षता घेण्यात आली आहे. शहरातील हातपंप दुरुस्त करून विंधन विहिरींचे निर्जंतुकीकरण केले आहेत.
१२०० विद्यार्थी स्वयंसेवक
पालखी मुक्कामाचे ठिकाण असलेले शारदा प्रांगण येथे मंडप, स्टेज, विद्युत, शौचालय, स्नानगृह व निवारा आदी आवश्यक सर्व व्यवस्था केली आहे. नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांसह ४५० अधिकारी व कर्मचारी वारकऱ्यांच्या व्यवस्थेसाठी काम करीत आहे. प्रत्येक कामासाठी स्वतंत्र समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. स्वच्छता व जनजागृतीविषयक कामासाठी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय व विद्या प्रतिष्ठानचे १२०० विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून काम करणार आहेत.
शौचालयाची सुविधा २६ ठिकाणी
बारामती नगर परिषद व बारामतीमधील ‘बारामती सजग नागरिक मंच’ यांनी संयुक्तपणे शौचालय व्यवस्थापनाचे नियोजन केले आहे. शहरात मार्केट यार्ड- इंदापूर रोड (२), मोतीबाग चौक, घोलप ऑटो, हॉटेल सुदित, देसाई इस्टेट, तुपे बंगला, कुलकर्णी बंगला, रेल्वे स्टेशन, पतंजली स्टोअर-भिगवण रोड, शिवकृपा सोसायटी, गोरे चाळ, श्रॉफ पेट्रोल पंप, नेवसे रोड, दाते गणेश मंदिर, सांस्कृतिक केंद्र, वणवे मळा, नाना नानी पार्क, पांढरीचा महादेव, कृषी उत्पन्न बाजार समिती (जळोची) अशा २६ विविध ठिकाणी शौचालय उभारण्यात येणार आहेत.
टँकर भरण्याची, स्नानगृहाची सुविधा
सर्व दिंड्यांना टँकरने पाणी भरण्याकरीता जलशुद्धीकरण केंद्र (२), कॅनाल पुलावर पाटस रिंग रोड, अवचट इस्टेट, कचरा डेपो रस्ता, हॉटेल चैतन्य या पाच ठिकाणी सोय उपलब्ध आहे. शारदा प्रांगण येथे वारकरी स्त्री- पुरुष यांना वेगवेगळी स्नानगृहाची व्यवस्था केली आहे. नगर परिषदेमार्फत शारदा प्रांगण येथे आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवला आहे. हेल्पलाइन १८०० २३३२ ३०२ क्रमांक कार्यान्वित आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.