पुणे

सभासदांचा कौल मान्य असल्याची माळेगावच्या विरोधी पॅनेलची प्रतिक्रीया

CD

माळेगाव कारखान्याच्या सभासदांनी दिलेला कौल मान्य आहे. मात्र, उपमुख्यमंत्र्यांना ही निवडणूक जिंकण्यासाठी सोळा सभा घ्याव्या लागल्या. आठवडाभर बसून राहावे लागले. घरोघरी जावे लागले. लक्ष्मीदर्शन द्यावे लागले. जिल्हा बँक रात्री अकरा वाजता उघडून पाकीट भरून शेतकऱ्याला पोचवावी लागतात. पैशाचे वाटप करण्याची वेळ आली. उपमुख्यमंत्री व क्रीडा मंत्र्यांना सभासदांनी गुडघ्यावर आणले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. उपमुख्यमंत्री माळेगावच्या निवडणुकीसाठी सत्तेचा पुरेपूर गैरवापर केला. स्वतःचा पॅनेल निवडून आणण्यासाठी त्यांना एवढा मोठा संघर्ष करावा लागला, यातच आम्ही आमचा विजय समजतो. उपमुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्यानुसार सर्वाधिक भाव माळेगावच्या सभासदांना द्यावा, हीच अपेक्षा.
- रंजनकुमार तावरे, सहकार बचाव पॅनेल

‘मीच तुमच्या माळेगाव कारखान्याच्या सभासदांचे भले करू शकतो,’ या मुद्याभोवती गोल फिरलेली ही निवडणूक होती. शेवटपर्यंत सभासदांना या मुद्याच्या बाहेर पडताच आले नाही. सत्तेच्या समीकरणातून आर्थिक गणिते माझ्याकडेच आहे आणि ती गणिते मीच सोडू शकतो, असे लोकांना आत्मविश्वासाने सांगितल्याने सभासदांनी त्यावर विश्वास ठेवत पॅनेलला बहुमत दिले. मात्र, सभासदांचे खरेच भले होणार का? हे येणारा काळच ठरवेल.
- दशरथ राऊत, कष्टकरी शेतकरी पॅनेलचे प्रमुख

शेतकऱ्यांची मते लक्ष्मीदर्शन दाखवून वळवून घेतली आहेत. आमचे पॅनेल पक्षविरहीत शेतकऱ्यांच्या हितासाठी केले होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आम्हाला आशीर्वाद दिले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची वाटचाल अधिक प्रभावीपणे करणे शक्य झाले असते. सभासदांना आम्ही आवाहन केले होते. सभासदांनी जो कौल दिला आहे, तो आम्हाला मान्य आहे.
- ॲड. एस. एन. जगताप, बळिराजा पॅनेलचे प्रमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप महाराष्ट्रातून राज्यसभेवर देणार महिला उमेदवार, राष्ट्रपती द्रौपदी मूर्मूंच्या निकटवर्तीय; तातडीनं बोलावलं मुंबईला

रक्तातील कावीळ कशी होते? कोणत्या अवयवावर ताण येतो? 'या' 6 लक्षणांकडे दुर्लक्ष म्हणजे मृत्यूला आमंत्रण!

Latest Marathi News Live Update : माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात इराणच्या समर्थनार्थ आंदोलन

BEST Bus Accident: भांडुप बस अपघात प्रकरणी धक्कादायक खुलासा, चालकाने प्रशिक्षणच पूर्ण केलं नाही; ७०४ पानी आरोपपत्र

Iran Islamic Revolution: १९७८ चा रक्तरंजित उठाव… इराणमध्ये कशी झाली इस्लामिक राजवटीची सुरुवात, काय आहे इतिहास?

SCROLL FOR NEXT