बारामती, ता. १ : तालुक्यातील ग्रामपंचायतीतील ठरावीक सरपंचपदाचे येत्या सात जुलैला नव्याने फेरआरक्षण काढण्यात येणार आहे. तहसीलदार गणेश शिंदे यांनी याबाबत सर्व ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांना सूचित केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ६ मे २०२५ पारीत आदेशास अनुसरून महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच आणि उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ च्या नियम २-अ मधील उपनियम (१) आणि (२) अन्वये या बाबतची शासन अधिसूचना अतिक्रमित करून प्रस्तुत अधिसूचना राजपत्रात प्रसिद्धी झालेल्या तारखेपासून पुढील पाच वर्षाच्या कालावधीसाठी सरपंच आरक्षण निश्चित केलेले आहे.
या अधिसूचनेद्वारे बारामती तालुक्यातील ९९ ग्रामपंचायतीकरिता सरपंच पदांपैकी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला (अनु. जाती, अनु. जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यांतील महिलांसह) यांच्यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायतीमधील (केंद्र शासनाने घोषित केलेले अनुसूचित क्षेत्रात पूर्णतः येणाऱ्या ग्रामपंचायती वगळून) सरपंचाची पदे तालुकानिहाय संदर्भीय आदेशान्वये वाटप केली आहे. नवीन रचनेनुसार नागरिकांचा मागास प्रवर्ग संवर्गातील सरपंचपदाची एक जागा वाढणार असून, खुल्या प्रवर्गातील एक जागा कमी होणार असल्याची माहिती तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली.
त्या अनुषंगाने बारामती तालुक्यासाठी येत्या सोमवारी (ता. ७) नव्याने फेरआरक्षण काढण्यात येणार आहे. दुपारी बारा वाजता कवी मोरोपंत सभागृहात ही आरक्षण सोडत काढली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.