पुणे

स्वच्छ, सुंदर शहरासाठी योगदान द्या

CD

बारामती, ता. १३ : ‘‘बारामती हे आपले शहर आहे, असे मानून प्रत्येक बारामतीकरांनी या शहराच्या स्वच्छता व झाडांच्या बाबतीत काळजी करणे गरजेचे आहे. आपल्या सर्वांसाठीच विकासाचे प्रकल्प सुरू आहेत. बारामतीकरांनीच हे शहर स्वच्छ, सुंदर व हरित असेल या साठी योगदान देणे गरजेचे आहे,’’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

बारामती येथील बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया बारामती सेंटरच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा शपथविधी सोहळा शनिवारी (ता. १२) पार पडला. त्याप्रसंगी पवार बोलत होते. ते म्हणाले की, लवकरच भिगवण चौकातील हुतात्मा स्तंभाचे स्थलांतर करणार आहे. सध्या वाहतुकीचा प्रश्न येथे जटिल होत आहे, त्यामुळे आहे त्याहून अधिक चांगल्या पद्धतीने सुशोभीकरण करून नवीन ठिकाणी हा स्तंभ उभारण्याचा प्रयत्न असेल. बारामती शहरात चार कोटी खर्चून सुंदर फाऊंटन तयार करणार आहे. सर्वांगसुंदर असे फाऊंटन असेल. बारामतीतील श्री सिद्धेश्वर मंदिराचाही जीर्णोद्धार करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

बांधकाम क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक टिकाऊ व मजबूत इमारती कशा होतील याचा प्रयत्न असोसिएशनने करावा, असेही त्यांनी नमूद केले.
बिल्डर असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जगन्नाथ जाधव, माजी राष्ट्रीय अध्यक्ष निलिमेश पटेल, उपाध्यक्ष आनंद गुप्ता या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

साहिल सुरेश खत्री यांनी नूतन अध्यक्ष म्हणून शपथ ग्रहण केली. त्यांच्यासमवेत उपाध्यक्ष सुभाष धिमान, सचिव आदेश वडूजकर, खजिनदार डी.एस. रणवरे, सहसचिव जितेंद्र जाधव तसेच गव्हर्निंग कौन्सिल सदस्य संजय संघवी, श्‍यामराव राऊत, एक्झिक्युटिव्ह कमिटी सदस्य किशोर मेहता, मनोज पोतेकर, आशपाक सय्यद, उद्धव गावडे, सुभाष जांभळकर, चंद्रकांत शिंगाडे, विक्रांत तांबे, राजेंद्र खराडे, अविनाश लगड, सुनील देशमुख, अविनाश सूर्यवंशी, सुशील घाडगे, नीतिश शहा यांनीही शपथ घेतली.

थोडी जबाबदारीही उचला....
बिल्डर असोसिएशन व त्यांच्या सारख्या संस्थांनी या शहराच्या विकासाच्या दृष्टीने तुम्हाला झेपेल इतकी जबाबदारी सामाजिक बांधिलकी या नात्याने घ्यायला हवी, अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली.

13116

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Worli Fire: वरळीत भीषण आग! अनेक झोपड्या जळाल्या, आगीमागचं नेमकं कारण आलं समोर

World Cup 2025, IND vs ENG: भारताला पराभूत करत इंग्लंडने मिळवलं सेमीफायनलचं तिकीट! हरमनप्रीत कौर-स्मृती मानधनाची झुंज व्यर्थ

Pune Fire : सदाशिव पेठेतील चव्हाण वाड्याला भीषण आग, चार घरांचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली

World Cup 2025, INDW vs ENGW: दीप्ती शर्माने घडवला इतिहास! 'असा' पराक्रम करणारी भारताची पहिलीच महिला क्रिकेटपटू

Fake Pesticide : बनावट कृषी निविष्ठा विक्री प्रकरणी वणी पोलिसांची कारवाई; दोन आरोपींवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT