पुणे

दादांच्या दूरदृष्टीमुळे बारामतीचा सर्वांगीण विकास

CD

एखाद्या शहराचे नेतृत्व खंबीर व दूरदृष्टीचे असते, त्यावेळेस त्या शहराचा सर्वांगिण विकास अत्यंत वेगाने होतो. केवळ इमारतींचा विकास नव्हे तर सांस्कृतिक, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, उद्योग अशा विविध क्षेत्रांमध्ये त्या शहराचा कायापालट होत असतो. बारामती हे त्याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली गेल्या तीन दशकांकडून अधिक काळात बारामतीचा सर्वांगीण विकास झालेला आहे.
- जवाहर शहा (वाघोलीकर),
मा. नगराध्यक्ष व अध्यक्ष अनेकांत एज्युकेनशन सोसायटी, बारामती.


प्रचंड कष्ट, मेहनत व निर्णय घेण्याची क्षमता या नेतृत्वगुणांमुळे अजित पवार यांनी बारामती शहराचे जवळपास ३५ वर्षांहून अधिक काळ नेतृत्व केले आहे. यामध्येही वैशिष्ट्य म्हणजे राज्यामध्ये अनेक राजकीय मतप्रवाह निर्माण झाले, नवीन राजकीय लाटा आल्या गेल्या, तरीही अजित पवार यांची बारामतीवरील पकड कायम मजबूत राहिली. बारामतीकरांनी त्यांना भरभरून मतांनी विजयी केले. दुसरीकडे पवार यांनी देखील बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी जिवाचे रान केले.


बारामती स्वच्छ, सुंदर व स्मार्ट शहर
राज्यातील इतर अनेक शहरांमध्ये विविध कामानिमित्त जाण्याचा प्रसंग येतो, त्यावेळेस त्या शहरांची असलेली परिस्थिती पाहता बारामती खऱ्या अर्थाने एक स्वच्छ, सुंदर व स्मार्ट शहर आहे हे जाणवते. राजकीय इच्छाशक्ती प्रबळ असेल तर त्या शहरातील विकासाचा वेग कायम राहतो हे बारामती बाबत वारंवार सिद्ध झाले आहे. अजित पवार सत्तेत असो वा नसो त्यांनी कायमच बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी निधी खेचून आणण्याचे काम सातत्याने केले. त्याचा परिणाम म्हणजे आज बारामती टुमदार व स्मार्ट सिटी म्हणून राज्यात ओळखली जाते.

बारामतीतील सर्वच इमारतींची राज्यात छाप
प्रशासनावर अजित पवार यांची असलेली मजबूत पकड विचारात घेता बारामती शहरातील सर्वच शासकीय विकास कामे वेळेस सुरू झाली व वेळेत पूर्ण झाली. त्यामुळे नागरिकांना त्या विकास कामांचा परिपूर्ण उपयोग होत आहे. एखादे काम हातात घेतल्यानंतर ते नियमात बसवून, त्याला प्रशासकीय मान्यता मिळवणे, निधी उपलब्ध करून देणे, संबंधित कंत्राटदाराकडून ते काम दर्जेदार करून घेणे, त्याची रंगसंगती, लॅंडस्कॅपिंग व इतर बाबी अजित पवार स्वतः बारकाईने पाहतात. त्या मुळे बारामतीतील बहुसंख्य शासकीय व निमशासकीय इमारतींचे काम अत्यंत सुंदर झाले आहे. पंचायत समिती असो व बारामती नगरपालिका, महावितरणची इमारत असो किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत... या सर्वच इमारती राज्यात खऱ्या अर्थाने एक वेगळी छाप पाडणाऱ्या निर्माण झाल्या आहेत. अर्थातच त्याचे सर्व श्रेय अजितदादा पवार यांना द्यावे लागेल.

बारामतीकरांचे काम झटपट करण्याचा आग्रह
कोणताही बारामतीकर त्यांच्याकडे कोणतेही काम घेऊन गेला तर ते काम करताना तो आपला समर्थक आहे की विरोधक आहे हे कधीच पाहत नाहीत. बारामतीकरांचे प्रत्येक काम वेळेत व झटपट व्हायला पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. जे काम होणार असते ते तातडीने स्वतः फोन करून मार्गी लावतात, जे काम होणार सारखे नसेल त्यावेळेस ते स्पष्टपणे हे काम होणार नाही असे सांगतात. बारामतीकरांना त्यांच्या मुंबई किंवा पुणे स्तरावरील कामांसाठी पुणे किंवा मुंबईला हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी स्वतःच्या स्वीय सहाय्यकांना सातत्याने ते सूचना देतात, बारामतीकरांना हेलपाटा होऊ नये या दृष्टिकोनातून काळजी घेतात.


दादा ‘अनेकांत’च्या पाठीशी कायमच उभे
आमच्या अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या कामाच्या संदर्भात अनेकदा आम्ही असे अनुभव घेतले आहेत. केवळ एक फोन केल्यानंतर अजितदादा त्या फोनवरच आमची कामे मार्गे लावतात.
आम्हाला पुणे किंवा मुंबईला जाण्याची आवश्यकता पडत नाही. अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय असो अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल असो किंवा एम.बी.ए. किंवा फार्मसीचे कॉलेज.... या सर्वच शैक्षणिक संस्था या आपल्याच आहेत या भावनेतून अजितदादा पवार यांनी कायमच आमच्या पाठीशी उभे राहण्याची सातत्याने भूमिका घेतली. आपल्या मतदारसंघातील विद्यार्थी उत्तम शिक्षण घेऊन त्यांनी एक सुदृढ व सक्षम नागरिक बनावे, ही त्यांची कायमच इच्छा असते, त्यामुळे आमच्या कोणत्याही कामाला अजितदादा पवार यांनी कधीही नाही म्हटले नाही हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता.

मतभेद बाजूला सारून दर्जेदार विकासकामे
राजकीय विचार वेगळे असले, मतभेद असले तरीदेखील ज्यावेळेस एखादा विकास कामांचा विषय येतो त्या ठिकाणी सर्व मतभेद बाजूला सारून संबंधित विकासकाम वेगाने व दर्जेदार कसे होईल या दृष्टिकोनातून अजितदादांचा कायम प्रयत्न असतो. बारामती नगर परिषद असो किंवा इतर शैक्षणिक संस्था याबाबत अधिकाधिक चांगल्या पद्धतीने काम व्हावे, राज्यात किंवा देशात जर कोणी काही चांगले करत असेल तर त्याचे अनुकरण आपल्या भागातील संस्थांनी देखील करावे असा त्यांचा कायम आग्रह असतो व त्यासाठी ते तशा पद्धतीने अनेकदा सल्लाही देत असतात.

काम कसे करून दाखवावे हे अजितदादा पवार यांच्याकडूनच शिकावे अशी परिस्थिती आहे. अत्यंत खंबीर नेतृत्व व चांगल्याला चांगले म्हणण्याची त्यांची पद्धत ही मला कायम आवडते. अजितदादा पवार यांच्या समवेत देखील मी अनेक वर्ष काम केले आहे. अजितदादा यांची कामाची तडफ व एखादे काम हाती घेतल्यानंतर ते वेळेत मार्ग कसे लावायचे, त्यासाठी तातडीने निर्णय घेऊन कार्यवाही कशी करायची, प्रशासनाला कशा सूचना द्यायच्या, निधीची उपलब्धता कशी करून घ्यायची, यासारख्या गोष्टी अजित पवारच करू शकतात असा माझा विश्वास आहे.

कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती उत्तम
बारामती शहराचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे बारामतीत सामाजिक सुरक्षितता मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे बारामतीत येऊन स्थायिक होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अजित पवार यांच्यासारखे नेतृत्व बारामतीला लाभले असल्यामुळे बारामतीची कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती उत्तम आहे. कधीही कोणतीही घटना घडल्यानंतर अजित पवार तातडीने हस्तक्षेप करत बारामतीकरांना गुंडगिरी किंवा दादागिरी सहन करावी लागणार नाही, यासाठी सतर्क असतात.
बारामतीत कोणत्याही प्रकारची गुंडगिरी, दादागिरी चालत नाही, सामाजिक सुरक्षितता उत्तम आहे व बारामतीचे एकूणच वातावरण हे सकारात्मक असल्यामुळे या सर्व बाबींचे श्रेय अजितदादा यांनाच द्यावे लागेल. त्यांचा प्रशासनावर धाक असल्यामुळे बारामतीत व्यापारी व उद्योजक देखील सुरक्षित आहेत. काहीही घटना घडल्यानंतर हक्काने व्यापारी अजितदादांकडे जातात व दादाही तातडीने फोन उचलून व्यापाऱ्यांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतात, हे अनेक वर्षे मी जवळून पाहत आहे.

अजितदादांसारखा आमदार लाभणे बारामतीकरांचे भाग्यच
अजितदादा पवार आज यशाच्या शिखरावर आहेत, त्यामागे त्यांचे प्रचंड कष्ट, मेहनत व लोकांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची सवय या गोष्टी आहेत. राज्यातील कोणताच आमदार पहाटे पाच वाजता उठून सकाळी सहा वाजता विकास कामांची पाहणी करण्यासाठी जात असेल असे मला वाटत नाही. प्रत्येक काम बारकाईने पाहून ती इमारत कशी दर्जेदार होईल व शासकीय निधीचा योग्य पद्धतीने कसा होईल याची काळजी घेणारा अजितदादांसारखा आमदार बारामतीला लाभला आहे हे बारामतीकरांचे भाग्यच म्हणावे लागेल.

अर्थकारण वाढण्यात दादांचा सिंहाचा वाटा
गेली अनेक वर्ष व्यापारी बांधवांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली. आज बारामतीचे अर्थकारण ज्या वेगाने वाढत आहे, त्यामागे अजित पवार यांनी बारामतीचा जो सर्वांगीण विकास केला आहे त्याचा सर्वाधिक वाटा आहे. आज बारामतीचे मोठ्या प्रमाणात नागरिकरण होत आहे. बारामतीत अनेक शासकीय कार्यालय सुरू झाली आणि शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या. अनेक सोयी सुविधा त्यांनी निर्माण करून दिल्या, त्यामुळे बारामतीचे अर्थकारण अधिक गतिमान झाले आहे. बारामती एक मोठे शहर म्हणून विकसित होत आहे मात्र तरीही या शहराच्या वाढीमध्ये कोठेही बकालपणा आलेला नाही. नियोजनबद्ध विकास अजितदादांच्या प्रयत्नातून होत आहे, याचा मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो.

शून्यातून विश्व निर्माण करणारा नेता
एक अतिशय कष्ट करणारा व शून्यातून विश्व निर्माण करणारा नेता या राज्याचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहे. प्रशासनावर त्यांची असलेली पकड व गेल्या ३५ वर्षांचा त्यांचा विविध विभागांचा अनुभव विचारात घेता भविष्यामध्ये अजितदादा पवार यांना या राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळो, अशी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी सदिच्छा व्यक्त करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करतो.

13143, 13144

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prashant Kishor injured: प्रशांत किशोर यांना रॅलीदरम्यान मोठी दुखापत; पाटणामधील रूग्णालयात उपचार सुरू!

Shocking! अनेकांसोबत शारीरिक संबंध; १०० कोटी उकळले, 'ती' महिला नेमकी कोण? धक्कादायक सत्य समोर

Pahalgam attack: 'टीआरएफ'चा जागतिक दहशतवादी संघटनांच्या यादीत समावेश; भारताकडून निर्णयाचं स्वागत

Raj Thackeray Warning Nishikant Dubey: ‘’दुबे तुम मुंबई मै आजाओ.., समंदर मै डुबे डुबे कर मारेंगें...’’ ; राज ठाकरेंचा कडक पलटवार!

Sangli Poisoning : कर्जबाजारी कुटुंबाने उचलेले टोकाचे पाऊल! विषप्राशनाने सासू-सुनेचा मृत्यू, वडीलांसह मुलाची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT