पुणे

आमदार खोतकर यांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

CD

बारामती, ता. ३१ : खाटीक समाजाबद्दल आक्षेपार्ह उद्‌गार काढल्याप्रकरणी शिवसेने (शिंदे गट)चे आमदार अर्जुन खोतकर यांच्या विरोधात भिगवण (ता. इंदापूर) पोलिस ठाण्यामध्ये अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामतीचे खाटीक समाजाचे कार्यकर्ते करण सुनील इंगुले यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंगुले यांनी रविवारी (ता. ३१) बारामतीत पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. खाटीक समाजाबद्दल आक्षेपार्ह उद्‌गार काढल्याप्रकरणी समाजबांधवांनी बारामतीसह इतर ठिकाणी आंदोलन केले होते. जोपर्यंत खोतकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत बेमुदत उपोषणाचा निर्णय करण इंगुले यांनी घेतला होता. बारामतीच्या प्रशासकीय भवनासमोर त्यांनी काही दिवस उपोषणही केलेले होते. या संदर्भात पोलिसांवर देखील गुन्हा दाखल करण्यासाठी कमालीचा दबाव होता. अखेर भिगवण पोलिसांनी अर्जुन खोतकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सलग दोन दिवस अर्जुन खोतकर यांनी खाटीक समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. यामध्ये खाटीक समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे याप्रकरणी अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती, त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. भिगवण पोलिसांनी हा गुन्हा पुढील तपासासाठी जालना पोलिसांकडे वर्ग केला आहे. रम्यान, यासाठी ॲड. अमोल सोनवणे, ॲड. ओंकार इंगुले, ॲड. मेघराज नालंदे, कैलास ताडे, विजय इंगोले, पंकज निकुडे, संग्राम इंगुले यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

Income Tax Notice Scam : तुम्हालाही इन्कम टॅक्सची नोटीस आलीय ? आजिबात करु नका 'ही' चूक, होईल मोठे नुकसान

झाकीर खानची तब्येत बिघडली! मुंबईच्या लीलावती रुग्णालयात केलं भर्ती, नक्की झालं काय?

Uri Encounter: अफगाणिस्तानवर हल्ल्यानंतर पाकड्यांचा मध्यरात्री उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न, भारतीय सैन्याने जाग्यावरच केलं ठार!

धक्कादायक! आधीच टंचाई त्यात गॅस सिलिंडरची चोरी, ७६ चोरले पण फक्त १२ भरलेले...

SCROLL FOR NEXT