बारामती, ता. २१ : शहरातील रस्त्यालगत तयार केलेल्या पदपथांवर दुकानदारांसह इतरांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्यामुळे त्यावर चालण्यासाठी जागा मिळत नाही. खंडोबानगर परिसरात अलीकडेच झालेल्या अपघातानंतर वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न अधोरेखित झाला आहे.
दरम्यान, नगर परिषदेने अनेकदा अतिक्रमण हटाव मोहीम राबवली असली तरी अतिक्रमण पुन्हा सुरू होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. दुकानदारांनी पदपथांवर बेकायदा शेड्स आणि माल ठेवून सार्वजनिक जागा बळकावल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावरचा वाहतूक ताण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे अतिक्रमणांवर कठोर कारवाई करून पदपथांना मुक्त करण्याची मागणी केली आहे. पदपथ रिकामे केल्यास नागरिकांना सुरक्षित आणि आरामदायी चालण्याची जागा मिळेल. तसेच रस्त्यावर होणाऱ्या अपघातांचा धोका कमी होण्यास मदत होईल, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.