बारामती, ता. २५ : नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये समाजमाध्यम, इलेक्ट्रॉनिक किंवा मुद्रित माध्यमातून प्रचार करताना मीडीया सर्टीफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटीची पूर्वपरवानगी गरजेची असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी पंकज भुसे यांनी दिली आहे.
या संदर्भात सर्व उमेदवारांना लेखी पत्रे पाठविण्यात आली आहे. त्यात नमूद केलेले आहे की, राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, कोणत्याही सोशल मीडिया/इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे प्रचार करण्याकरिता एम.सी.एम.सी. (Media Certification & Monitoring Committee) समितीकडून पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य आहे. प्रिंट मिडिया, सोशल मीडिया/इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर एमसीएमसी समितीकडून आवश्यक परवानगी न घेता प्रचार करणे हे कृत्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना व नियमांचे उल्लंघन ठरते. वरील अनियमिततेसंदर्भात दखल घेऊन आपण पूर्वपरवानगीशिवाय कुठल्याही माध्यमामध्ये आपला प्रचार करू नये. आपण पूर्वपरवानगीशिवाय प्रचार करीत असल्याचे निदर्शनास आल्यास नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक कायद्यानुसार व राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार आपल्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, याची गंभीर नोंद घ्यावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.