पुणे

निवडणूक लांबल्याने बारामतीत शांतता

CD

बारामती, ता. ३० : नगरपरिषदेची येत्या २ डिसेंबरला होणारी निवडणूक आता २० डिसेंबरला होणार असल्याची घोषणा झाल्यानंतर बारामतीत रविवारी (ता. ३०) प्रचाराच्या आघाडीवर सामसूम होती. गेले अनेक दिवस प्रचारात रात्रीचा दिवस करणाऱ्या उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनीही ही घोषणा झाल्यानंतर रविवारी विश्रांती घेणेच पसंत केले. दररोज रिक्षाद्वारे होणाऱ्या प्रचाराला वैतागलेल्या बारामतीकरांनीही रविवारी शांतता अनुभवली.
गेले आठ दिवस बारामतीत रॅली, पदयात्रा, घरोघरी जाऊन प्रचार, कॉर्नर सभा, आरोप प्रत्यारोप, समाजमाध्यमांद्वारे होणारा प्रचार या माध्यमातून निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले होते. अगदी उद्यावर मतदान आलेले असताना अचानक शनिवारी (ता. २९) रात्री उशिरा निवडणूक आयोगाने न्यायालयात गेलेल्या उमेदवारांच्या प्रभागातील निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याने उत्साही उमेदवार हिरमुसले होते. रविवारी बारामती सकाळपासून अनेक अफवांना ऊत आला होता. मात्र मतदानाची तारीख बदलण्यापेक्षा फारसा काही बदल झालेला नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अनेकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. बारामतीत आठ उमेदवार बिनविरोध निवडून गेलेले आहेत, त्यांनाही या निकालानंतर काहीशी धाकधूक होती, पण त्यांच्या बिनविरोध निवडीबाबत काहीही आदेश नसल्याने त्यांनाही दिलासा मिळाला. प्रचाराला अवधी कमी आहे अशी तक्रार करणाऱ्या कार्यकर्त्यांना आता जवळपास तीन आठवड्यांचा कालावधी मिळाला आहे. तीन आठवडे आता पुन्हा कार्यकर्ते व हितचिंतकांना सांभाळावे लागणार असल्याने उमेदवार चिंतेत आहेत. रविवारी अनेकांनी विश्रांती घेतल्याने प्रचाराच्या आघाडीवर शांतता होती. निवडणुकीचा पुढील कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर पुढील रणनीती आखण्याचा निर्णय अनेक उमेदवारांनी घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सलग तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त! 20 दिवसांतील सर्वात कमी दर, 10 तोळ्यांमागे 36,500 रुपयांची घसरण; पाहा आजचा भाव

Miraj PSI Death : मिरजेतील पीएसआयने कॉल, मेसेजला उत्तर दिलं नाही; नंबर ट्रॅक लावला अन् घटनास्थळी पाहताच, एसपींसह सांगली पोलिसांना बसला धक्का

Latest Marathi News Live Update : ग्रामीण भागातही गॅससाठी रांगा, मोवाड-नरखेडमध्ये नागरिकांची सकाळपासून गर्दी

Nashik: कुंभमेळ्याची तयारी सुरु असताना नाशिकला ‘पाण्याचा आशीर्वाद’? अंडरपास खोदकामात सापडली १२५ वर्षांपूर्वीची पाण्याने भरलेली विहीर

Kolhapur Money Fraud : नफ्याच्या आमिषाने २१ लाखांची  फसवणूक ; संशयित गडहिंग्लजचा, व्यापारी चंदगडचा

SCROLL FOR NEXT