पुणे

बारामतीत तरुणाकडून पिस्तूल, काडतुसे जप्त

CD

बारामती, ता. २ : शहरातील एका शाळेजवळ एक व्यक्ती शस्त्रासह फिरत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर केलेल्या कारवाईत पोलिसांनी प्रदीप सुरेश नकाते (वय २७, रा. ऋतुसृष्टी अपार्टमेंट, प्रगतीनगर, बारामती) यास अटक केली.
पोलिसांच्या गस्ती पथकाला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरिक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सतीश राऊत, पोलिस अंमलदार अमीर शेख, दत्तात्रेय मदने व इतर पथकाने त्यास पकडून झडत घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल, चार जिवंत काडतुसे व मॅगेझिन असा मुद्देमाल पोलिसांना सापडला. या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. न्यायालयाने आरोपीस पोलीस कोठडी दिली. चौकशीदरम्यान आरोपीने शस्त्र कोठून मिळविले यासंबंधीची माहिती पोलिसांना दिली आहे. शस्त्र पुरवठादाराचा शोध पोलिसांनी आता सुरु केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DMart मध्ये खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना! हे नियम माहिती नसतील तर नुकसान होऊ शकते, खरेदीपूर्वी नक्की वाचा!

Kolhapur Police Recruitment : कोल्हापुरात पोलिस भरतीसाठी लेखी परीक्षा उद्या; ८८ पदांसाठी ११३५ उमेदवार मैदानात

Multibagger Stock: ₹11 चा शेअर थेट ₹1100 वर! 1 लाखाचे झाले तब्बल 1 कोटी 10 लाख; 5 वर्षांत गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update : कल्याणमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; ९ वर्षांच्या मुलासमोर घडली धक्कादायक घटना

Kolhapur Water Project : ‘धामणी’चे अतिरिक्त पाणी करवीर तालुक्याला द्यावे; तर, कोल्हापूरला पोलिस आयुक्तालय हवे - नरके

SCROLL FOR NEXT