पुणे

बारामतीतील दांपत्याचा हुबळी परिसरात मृत्यू

CD

बारामती, ता. ३ : देवदर्शनाहून परत येताना कर्नाटक राज्यातील हुबळीजवळ झालेल्या अपघातात बारामतीतील दाम्पत्याचा मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या दोन्ही मुलांना मार लागला असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
बारामती येथील श्रायबर डायनामिक्स डेअरी इंडस्ट्रिजमध्ये कार्यरत असलेले अनिल सदाशिव जगताप (वय ५०) व त्यांची पत्नी वैशाली अनिल जगताप (वय ४५) हे दांपत्य व त्यांची दोन्ही मुले अथर्व (वय २४) व अक्षता (वय २०) हे तिरुपतीला देवदर्शनासाठी गेले होते. बुधवारी (ता. ३) पहाटे चारच्या सुमारास हुबळीजवळ एका ट्रकने अचानक ब्रेक दाबल्याने जगताप दांपत्यांचे वाहन मागून जाऊन ट्रकवर आदळून हा अपघात झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. या अपघातात अनिल व वैशाली जगताप यांचा मृत्यू झाला. याच वाहनात असलेली त्यांची दोन्ही मुले जखमी झाली असून, त्यांच्यावर हुबळीतील रुग्णालयात उपचार सुरु आहे. याच वाहनामध्ये त्यांच्या नातेवाईकांचा एक लहान मुलगाही होता, सुदैवाने त्यालाही फारशी दुखापत झाली नाही.
अनिल जगताप व वैशाली जगताप हे दांपत्य अत्यंत मनमिळावू होते, त्यांच्या अकाली जाण्याने बारामतीतील त्यांच्या मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला. गुरुवारी (ता. ४) सकाळी बारामतीत या दांपत्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष अभिजित जाधव यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

Pune News : महापालिकेच्या सर्वपक्षीय कार्यालयांच्या सुशोभिकरणासाठी लाखोची उधळपट्टी

Latest Marathi News Update: राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Shirur Accident : पुणे-नगर रस्त्यावर एसटी बसच्या धडकेत दूचाकीस्वार तरूणाचा मृत्यु

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

SCROLL FOR NEXT