पुणे

बारामतीत २७ मोबाईल मूळ मालकांना परत

CD

बारामती, ता. १६ : शहर परिसरातील सार्वजनिक ठिकाण व बाजारातून गहाळ झालेले २७ मोबाईल बारामती शहर पोलिसांनी तांत्रिक विश्‍लेषणाद्वारे शोधून मालकांना नुकतेच परत केले. जवळपास चार लाख रुपयांचे हे मोबाईल असल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी यांनी दिली.
पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या आदेशानुसार शहर पोलिसांनी हे मोबाईल शोधून काढले. यापैकी काही मोबाईल महाराष्ट्र तर काही मोबाईल परराज्यातूनही हस्तगत केले आहेत.
गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलिस उपनिरीक्षक सतीश राऊत, पोलिस अंमलदार अभिजित कांबळे, रामचंद्र शिंदे, सुलतान डांगे, सागर जामदार, अक्षय सिताप, विशाल शिंदे, गिरीश नेवसे, विशाल चौधर, पोपट कवितके यांच्या पथकाने २७ मोबाईल हस्तगत केले.

एकही गुन्हा दाखल नाही
बारामती शहर व तालुका पोलिसांनी मिळून जवळपास पाच लाखांहून अधिक रुपयांचे मोबाईल हस्तगत केले, पण या प्रकरणात एकही गुन्हा दाखल न झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. मोबाईल गहाळ होण्यापेक्षा चोरीला जाण्याचेच प्रमाण अधिक असताना यापैकी एकाही व्यक्तीवर गुन्हा कसा काय दाखल झाला नाही? याची बारामतीत चर्चा आहे. चोरीचा मोबाईल जवळ बाळगणे हा गुन्हा असतानाही संबंधितांपैकी एकालाही पोलिसांनी आरोपी कसे काय बनवले नाही? याचेही गूढ कायमच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईची तुंबई, पहिल्याच पावसाने दैना; मध्य रेल्वेचा खोळंबा, ट्रान्स हार्बर ठप्प

Mumbai-Goa Highway : पहिल्याच पावसात महामार्गाची दैना! उक्षी फाट्याला तळ्याचं स्वरूप, 18 वर्षांच्या वनवासानंतरही त्रास कायम

Nirav Modi UK Court Verdict : नीरव मोदीला लंडन हायकोर्टाचा मोठा झटका; बँक ऑफ इंडियाचे १०० कोटींचे कर्ज फेडण्याचे आदेश

Pune Rain Update: मंगळवार रात्रीपासून पुणे भिजलं; अनेक रस्ते जलमय, 4 दिवस पावसाचा इशारा

Monsoon Forecast Maharashtra : महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यात ३ दिवस पावसाचा इशारा, अरबी समुद्रात मॉन्सूनला पोषक हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT