पुणे

बारामतीतील सेंट्रल पार्कचे कामे गतीने पूर्ण करा

CD

बारामती, ता. २८ : शहरातील प्रशासकीय इमारतीच्या बाजूला नव्याने उभारण्यात येणारे सेंट्रल पार्कचे काम गतीने पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (ता. २८) अधिकाऱ्यांना दिल्या.
अजित पवार यांनी इंदापूर रस्ता व बसस्थानक परिसर सुशोभीकरण, सेंट्रल पार्क समोरील रिंगरोड सुशोभीकरण, महापुरुषांच्या पुतळ्याचे काम, जलतरण तलाव, गौतम बाग ते फडतरे वस्ती चौपदरी रस्त्याच्या कामाची पाहणी करत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी नगराध्यक्ष सचिन सातव, अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसीलदार स्वप्नील रावडे, गट विकास अधिकारी किशोर माने, मुख्याधिकारी पंकज भुसे, उपअभियंता सुभाष पाटील उपस्थित होते.
सेंट्रल पार्क बाहेरील रिंगरोड सुशोभीकरणाची कामे गतीने पूर्ण करावीत, प्रशासकीय इमारत आणि सेंट्रल पार्क दरम्यानच्या संरक्षक भिंतीची उंची वाढवावी, पदपथाच्या आतील बाजूस पाणी साठणार नाही, यादृष्टीने कामे करावीत, अशा सूचना त्यांनी केल्या. सेंट्रल पार्क समोरील जागेवर महापुरुषांचे पुतळे बसविण्याचे काम करण्यात येत असून पुतळ्यांच्या मागील बाजूस आकर्षक भिंतीचे काम करावे. पुतळ्याला हार घालताना अडचण येणार नाही, यादृष्टीने त्याची उंची घ्यावी. बसस्थानक परिसरात वाहतूक कोंडी होणार नाही, याकरिता रिक्षा, चारचाकी, दुचाकी यांच्याकरिता पर्यायी जागेचा विचार करावा. इंदापूर रस्त्यावरील जड, अवजड वाहनांच्या रहदारी विचारात घेता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नगरपरिषद आणि पोलिस प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. इंदापूर रस्त्याचे सुशोभीकरण करावे. गौतम बाग ते फडतरे वस्ती चारपदरी रस्त्याचे कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश अजित पवार यांनी दिले.

उत्कृष्ट गुणवत्तेचे साहित्य वापरा
नीरा डावा कालवा परिसरात उभारण्यात येणाऱ्या जलतरण तलावाच्या कामामध्ये उत्कृष्ट गुणवत्तेचे साहित्य वापरावे. कालवा परिसरात स्वच्छता राहील तसेच गाळ्याच्या दर्शनी भागात नावाचे फलक एकसारखे दिसेल, याबाबत दक्षता घ्यावी. शहरात अधिकाधिक वृक्षारोपण करावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tarique Rahman : तारिक रहमान - डार्क प्रिन्स, भ्रष्टाचाराचे आरोप, तुरुंगवास, मृत्यूदंडाची शिक्षा, लंडनला पलायन अन् आता बांगलादेशचे संभाव्य पंतप्रधान!

T20 World Cup : यूएईचा थरारक विजय अन् अफगाणिस्तानचे स्पर्धेतील पॅकअप जवळपास निश्चित! ड गटात मोठी उलथापालथ

Nagpur crime : नागपूरचं समाजस्वास्थ बिघडलं; गुन्हेगारीत प्रचंड वाढ; ४३ टक्क्यांनी वाढल्या खूनाच्या घटना

Latest Marathi News Live Update : पुण्यात तीन हजार वाहनचालकांचे परवाने रद्द

Mumbai Goa: कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-गोवा महामार्गाचे चार पदरी काम कधी पूर्ण होणार? नवीन तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT