पुणे

बारामतीत महिलेस डॉक्टरांनी दिले जीवनदान

CD

बारामती, ता. ३० : तीव्र पोटदुखीचा त्रास असलेल्या महिलेच्या पोटातील साडेचार किलो वजनाची गर्भाशयातील गाठ बारामतीत शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकली गेली.
बारामती येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. विशाल मेहता यांच्या नेतृत्वाखाली चार तासांच्या शस्त्रकीयेनंतर ही गाठ काढून टाकली गेली. शस्त्रक्रियेमुळे या महिलेस नवजीवन प्राप्त झाले आहे. या महिलेला काही दिवसांपासून तीव्र पोटदुखी, हालचालीत वेदना, जडपणा तसेच लघवीस अडथळा जाणवत होता. तपासणीत गर्भाशयातील मोठ्या आकाराची गाठ असल्याचे उघड झाल्यानंतर तिला प्रारंभी तालुक्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गाठ मोठी व महत्त्वाच्या अवयवांशी चिकटलेली असल्याने पुढील उपचारासाठी बारामतीतील मेहता हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. गाठ युरेटर, मूत्राशय, आतडे व आसपासच्या अवयवांना घट्ट चिकटलेली असल्याने शस्त्रक्रिया आव्हानाची होती. तरीही कौशल्यपूर्ण नियोजनातून साडेचार किलो वजनाची गाठ यशस्वीरीत्या काढण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर देखील या महिलेची व्यवस्थित काळजी घेतली गेल्याने तिची प्रकृती आता झपाट्याने सुधारत आहे. डॉ. विशाल मेहता, भूलतज्ज्ञ डॉ. निकिता मेहता, डॉ. पुष्पदंत रूगे तसेच संपूर्ण वैद्यकीय टीमने यात महत्त्वाची भूमिका निभावली.


महिलांमध्ये अशा गाठींचे प्रमाण वाढले असून बदलती जीवनशैली, प्रदूषण व अयोग्य आहार हे कारणीभूत ठरू शकतात. मासिक पाळीत तीव्र वेदना, पाठदुखी, ओटीपोटातील जडपणा अशी लक्षणे दिसल्यास त्वरित तपासणी व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. विशाल मेहता, बारामती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya: हार्दिक पांड्याविरोधात पुणे पोलिसात तक्रार; तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप

Cyber Crime : दहा कोटींच्या सायबर फसवणूकप्रकरणी सोलापूरमधून आरोपीला अटक

Monalisa Marriage: मुस्लिम तरुणासोबत लग्न केलं; पण वडिलांची भीती, घाबरलेल्या मोनालिसाची पोलिसात धाव अन्... व्हायरल गर्ल पुन्हा चर्चत

Latest Marathi News Update : आज कुठे काय घडलं? पाहा एका क्लिकवर...

स्वच्छता कंत्राटदारांना बसणार लगाम; आता नगरसेवकांच्या शिफारसीनंतरच मिळणार देयके, 'या' महानगरपालिकेचा मोठा निर्णय...

SCROLL FOR NEXT