पुणे

बारामतीत आजपासून राष्ट्रीय आंतरविद्यापीठ बेसबॉल स्पर्धा

CD

बारामती, ता. १ : असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २ जानेवारी ते १० जानेवारी या कालावधीत अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बेसबॉल स्पर्धांचे आयोजन बारामतीत होणार आहे. या स्पर्धेत ५९ पुरुष व ५५ महिला, असे एकूण ११४ संघ संपूर्ण भारतातून सहभागी होत असून, खेळाडू, मार्गदर्शक, पंच मिळून सुमारे २००० पाहुणे बारामतीत दाखल होणार आहेत.
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यकक्षेतीलच नव्हे तर राज्यातील एक अग्रगण्य व ''ए++'' दर्जा प्राप्त महाविद्यालय आहे. शिक्षण, क्रीडा व सर्वांगीण विकासाच्या क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या या महाविद्यालयाने यापूर्वी ७ आंतरविद्यापीठ स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले आहे. संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह (वाघोलीकर) यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धांची सर्व तयारी सुरू आहे.
याबाबत प्राचार्य प्रा. डॉ. अविनाश जगताप म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर क्रीडाक्षेत्रातही उत्कृष्ठ प्रगती करावी, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. संस्थेकडून खेळाडूंना आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाते.’’ संस्थेचे सचिव मिलिंद शाह (वाघोलीकर) म्हणाले, ‘‘अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याची संधी मिळणे, ही बारामतीकरांसाठी मोठी अभिमानाची बाब आहे. देशभरातील नामांकित खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना मिळणार आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare: अजितदादांचं विमान पाडलं की पडलं? तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

Sindhudurg Development : डांबरीकरणाकडून काँक्रिटीकरणाकडे; नवे रस्ते पर्व, ऊन, वारा, पावसात कितपत तग धरणार?

Latest Marathi News Update : १८ तारखेला रोहित पवार यांची मुंबईत पत्रकार परिषद, विमान अपघाताबाबत प्रेझेंटेशनचा दुसरा अंक

Pune News : वर्षात १५ दिवस मध्यरात्रीपर्यंत ध्वनिवर्धक वापरास परवानगी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून आदेश

Crime News : नाशिकमध्ये चोरांचे राज्य? भरदिवसा घरफोड्या करून १४ लाखांचा ऐवज लंपास; नागरिक भयभीत!

SCROLL FOR NEXT