पुणे

बारामतीत ८ जानेवारीपासून क्रेडाईचा गृह उत्सव

CD

बारामती, ता. ५ : बारामतीच्या सर्वांगिण विकासाला नवी दिशा देणारा आणि घर खरेदीदारांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारा ‘गृह उत्सव २०२६’ येत्या ८ ते १० जानेवारी दरम्यान बारामतीत आयोजित करण्यात आला आहे. सिटीईन चौकातील मुक्ताई लॉन्स येथे तीन दिवस सकाळी आठ ते रात्री १० वाजेपर्यंत हा उपक्रम सुरू असेल.
बारामती क्रेडाईच्या वतीने आयोजित या गृह महोत्सवातून बारामतीकरांना स्वतःच्या स्वप्नातील घर साकारण्याची संधी मिळणार आहे.
बारामतीत वाढते औद्योगिकीकरण, शिक्षण व आरोग्य सुविधा, तसेच आधुनिक पायाभूत विकासामुळे घर खरेदीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. याच पार्श्वभूमीवर घर खरेदीदारांना विविध पर्यायांचा एकाच ठिकाणी तुलनात्मक व प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने हा भव्य गृह उत्सव आयोजित केला आहे.

बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग
या गृह उत्सवात ५७ पेक्षा अधिक नामांकित बांधकाम व्यावसायिक सहभागी होणार असून, १३० हून अधिक गृहप्रकल्प नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहेत. यामध्ये एन. ए. प्लॉट्स, वन बीएचके ते फोर बीएचके सदनिका, रो- हाऊसेस, बंगलो तसेच कमर्शिअल गाळे यांचा समावेश आहे. जागा, बजेट व सुविधांनुसार घराची निवड करण्याची सोय या प्रदर्शनात उपलब्ध राहणार आहे.

कुटुंबासाठी मनोरंजनाचीही मेजवानी
गृह उत्सवात केवळ घर खरेदीच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबासाठी मनोरंजनाची व्यवस्था केली आहे. घर खरेदीसंदर्भात तज्ज्ञांचे मार्गदर्शन, मुलांसाठी खेळ, फूड झोन, विविध कार कंपन्यांचे डेमो, तसेच लकी ड्रॉद्वारे बक्षीसे काढली जाणार आहेत.

बारामतीत शिक्षण, आरोग्य, उद्योग व पर्यटन क्षेत्रातील संधी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. वैद्यकीय महाविद्यालय, आधुनिक रुग्णालय, शैक्षणिक संस्थांमुळे बारामतीत येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. रस्त्यांचे जाळे, विमानतळ प्रकल्प, औद्योगिक विस्तार व सुशोभीकरणामुळे रिअल इस्टेटचे बाजारमूल्य सातत्याने वाढत आहे.
- प्रफुल्ल तावरे अध्यक्ष, क्रेडाई महाराष्ट्र

पवार कुटुंबाच्या विकासात्मक दूरदृष्टीमुळे बारामती आज ‘विकसित स्मार्ट सिटी’ म्हणून नावारूपास येत आहे. वाढते नागरीकरण आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा पाहता, भविष्यात घरांच्या किमती आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज केलेली गुंतवणूक भविष्यात मोठ्या नफ्याची खात्री देणारी ठरेल.
- दत्तात्रेय बोराडे, अध्यक्ष, क्रेडाई बारामती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Jafari Iran strategy: अली जाफरी कोण आहेत? इराणची कडवी झुंज! अमेरिका-इस्रायलसारख्या महाशक्तींचा विजय का अशक्य ठरतोय?

Supreme Court on Menstrual Leave : ...तर महिलांच्या करिअरवर परिणाम; मासिक पाळीच्या रजेबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

'मला इच्छा आहे परंतु मी प्रेग्नेट नाही' नीना गुप्ता यांचा खुलासा, म्हणाल्या...'गोड बातमी असावी असं वाटतं पण...'

IPL 2026 Marathi News: कदाचित महेंद्रसिंग धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा, तो पिवळ्या जर्सीत पुन्हा दिसणार नाही !

Student Emotional Story : 'आई-वडील या जगात नाहीत..', चिमुरड्याचे 'ते' शब्द ऐकून डोळ्यात येईल पाणी; शिक्षकानं त्याच्यासोबत जे केलं, ते पाहून तुम्हीही कराल सलाम!

SCROLL FOR NEXT