पुणे

बारामतीतील आरोपी नागपूरला स्थानबद्ध

CD

बारामती, ता. ७ : येथील शहर व ग्रामीण भागात दहशत निर्माण करणाऱ्या गुंडावर एमपीडीएअंतर्गत (महाराष्ट्र प्रतिबंधक धोकादायक कृत्ये कायदा) कारवाई करत बारामती शहर पोलिसांनी त्याला एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे.
गणेश तुळशीराम पवार (वय ३३, रा. हंवीर बोळ आंबाडी, ता. बारामती) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मारहाण, धमकी, अवैध व्यवसाय तसेच धोकादायक वर्तनाच्या अनेक गुन्ह्यांमुळे त्याची शहरासह ग्रामीण भागात दहशत होती. सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे निदर्शनास आल्याने त्याच्याविरोधात एमपीडीएअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलिस ठाण्याने प्रस्ताव तयार करून मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला. प्रस्तावाची छाननी करून सक्षम प्राधिकाऱ्यांनी गणेश पवार यास एक वर्षासाठी स्थानबद्धतेचे आदेश दिले. त्यानुसार त्यास ताब्यात घेत त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले. ही कारवाई गुन्हे अन्वेषण शाखा व बारामती शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Shortage: पोळी, भाकरीलाही इंधनटंचाईचे ‘चटके’; प्रतिनग दोन ते पाच रुपयांनी दरवाढ

Ahilyanagar News: गुरुजींची बढतीसाठी खटपट! अहिल्यानगर जिल्हा परिषदेत एजंटांनी टाकले गळ, नियमातील संदिग्धतेने फावले..

Harish Rana Case: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालेलं? परदेशात विषारी इंजेक्शन टोचतात; पण भारतात इच्छामरण कसं दिलं जातं? कायदा काय सांगतो?

"खरे हिरो बाबाच!" शिवम दुबेने T20 World Cup चे मेडल घातलं वडिलांच्या गळ्यात; पाहा Video

Female Foeticide Law : 7 ते 10 वर्षांची जेल आणि थेट कारवाई! स्त्रीभ्रूण हत्येचा कलंक पुसण्यासाठी सरकारने आखला 'हा' प्लॅन; आरोग्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

SCROLL FOR NEXT