पुणे

‘एमएच ४२ बीडब्ल्यू’ क्रमांकाची चारचाकी वाहनांसाठी नवी मालिका

CD

बारामती, ता. १७ : खासगी चारचाकी संवर्गातील वाहनांसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती येथे ‘एमएच ४२ बीडब्ल्यू’ (MH ४२ BW) क्रमांकाची नवी मालिका सुरू करण्यात येणार असून आकर्षक व पसंतीचे क्रमांक राखीव ठेवण्यासाठी वाहनधारकांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक हवा असलेल्या वाहनधारकांनी मंगळवारी (ता. २०) दुपारी ३ वाजेपर्यंत विहित नमुन्यात धनाकर्ष (डी.डी.)सह अर्ज सादर करावा. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास त्यांची यादी बुधवारी (ता. २०) सकाळी १०.३० वाजता कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल.
यादीतील अर्जदारांनी लिलावासाठी जास्त रकमेचा धनाकर्ष सीलबंद पाकिटात २१ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजेपर्यंत कार्यालयात जमा करावा.
त्याच दिवशी दुपारी ४ वाजता संबंधित अर्जदारांसमोर पाकिटे उघडण्यात येऊन, विनिर्दिष्ट शुल्कापेक्षा जास्त रकमेचा धनाकर्ष सादर करणाऱ्या अर्जदारास पसंतीचा क्रमांक वितरित करण्यात येणार आहे.
अर्जासोबत पत्त्याचा पुरावा, छायाचित्र ओळखपत्र व पॅनकार्डची स्वाक्षांकित प्रत जोडणे आवश्यक असून धनाकर्ष हा “DY RTO, BARAMATI” या नावाने राष्ट्रीयकृत किंवा अनुसूचित बँकेचा बारामती येथील असावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! एप्रिलमध्ये ‘या’ महिलांनाच मिळणार ३००० रुपये, ‘ई-केवायसी’ न केलेल्या महिलांचा बंद होणार लाभ, वाचा...

उज्ज्वला योजनेच्या महिलांच्या डोळ्यात धूर! ऑनलाइन बुकिंगसाठी ४५ दिवसांची अट; अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय, पण अंमलबजावणी कागदावरच, वाचा...

Paneer Jowar Paratha: उन्हाळ्यात हलका पण पौष्टिक नाश्ता हवा असेल तर घरच्या घरी बनवा स्वादिष्ट पनीर ज्वारी पराठा

अग्रलेख : भारत- चीन व्यापाराचा नवा अध्याय

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १४ मार्च २०२६ ते २० मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT