बारामती : ‘पुणे ग्रँड टूर २०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचा गुरुवारी (ता.२२) बारामतीत समारोप होणार आहे. दुपारी अडीच वाजता आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, मेडद येथून स्पर्धकांचा बारामतीत प्रवेश होणार आहे. शहरात या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे उत्साहात स्वागत करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नगराध्यक्ष सचिन सातव यांनी केले आहे. मेडद-खंडोबानगर-कारभारी सर्कल-कसबा-प्रशासकीय भवन-आमराई-शाहू-इंदापूर रोड-मोतीबाग चौक पुढे पिंपळी-लिमटेक पालखी मार्गे वंजारवाडी पुढे भिगवण रस्त्याने डायनॅमिक्स कंपनी ते विद्यानगरी चौक असा असणार आहे. स्पर्धेचा समारोप दुपारी ४ वाजता विद्यानगरी येथील गदिमा सभागृहात होणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने बारामती शहराचे ब्रँडिंग व मार्केटिंग होणार असून आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे शहरातील सर्व संस्था, पदाधिकारी, समाजसेवक, गणेश मंडळ कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, सायकल व स्पोर्ट्स क्लबचे सदस्य, तसेच शाळा व महाविद्यालयांतील शिक्षक-विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत स्पर्धेच्या मार्गावर उपस्थित राहून स्पर्धकांचे उत्साहवर्धन करावे, असे आवाहन सातव यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.