बारामती, ता.२३ : राज्य निवडणूक आयोगाकडून बारामती जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकपदी विशाल नरवाडे यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी शुक्रवारी (ता. २३) बारामती प्रांताधिकारी कार्यालयात निवडणूक कामकाजाबाबत आढावा बैठक घेतली.
या बैठकीत निवडणुकीसाठी स्थापन केलेल्या सर्व समित्यांच्या कामकाजाचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततेत आणि नियमांचे काटेकोर पालन करून पार पाडावी, तसेच सर्व अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी दक्षतेने पार पाडावी, आचारसंहिता भंग होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. बैठकीनंतर त्यांनी स्ट्रॉंग रूमला भेट देऊन तेथील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. या प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्निल रावडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, पोलिस निरिक्षक चंद्रशेखर यादव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
निवडणुकीसंदर्भात तक्रारी असल्यास नागरिकांनी निरीक्षक विशाल नरवाडे यांच्याशी 7498668879 या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.