पुणे

शपथविधी त्यांचा पक्षांतर्गत निर्णय : शरद पवार

CD

बारामती, ता. ३१ : ‘‘शपथविधीची चर्चा बारामतीत झालीच नाही, ती मुंबईतच सुरू झाली. प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांना तो अधिकार आहे आणि प्राधान्याने काय करावे, हे त्यांनी ठरवलेले दिसतेय. त्यावर मी भाष्य करणार नाही, हा त्यांच्या पक्षांतर्गत प्रश्न असून, तो त्यांचा अधिकार आहे,’’
बारामतीत शनिवारी (ता. ३१) माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी वरील महत्त्वाचे विधान केले. ते म्हणाले, ‘‘दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विलिनीकरणाबाबत अजित पवार, शशिकांत शिंदे, जयंत पाटील हे या प्रक्रियेच्या जवळ येऊन पोहोचले होते. याबाबतची घोषणा १२ फेब्रुवारी रोजी होणार होती आणि ही तारीखही अजित पवार यांनीच निश्चित केली होती. मात्र, दुर्दैवाने नको ते घडले. दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण व्हावे, ही अजित पवार यांची इच्छा होती आणि ती आता पूर्ण व्हावी, अशी आमची इच्छा आहे.’’

अजित पवार यांचे कौतुक
यावेळी त्यांनी अजित पवार यांची प्रशंसा केली. ते म्हणाले, ‘‘सामान्य लोकात मिसळून त्यांनी त्यांचे प्रश्न समजून घेतले, ते कर्तृत्ववान होते, कायम कामासाठी ते झटत होते, सकाळपासूनच ते कामाला लागत असत. त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून काढण्यासाठी जे काही करता येईल ते आम्ही करत राहू. त्यांनी जे काम सुरु केले होते, ते काम पुढे सुरु ठेवावे लागेल आणि पवार कुटुंबियातील नवीन पिढी हे काम नक्की करेल, असा आपल्याला विश्वास वाटतो. नवी पिढी आव्हानांना सामोरे जाईल. आज अजित पवार हयात असते, तर ते घरी बसले नसते, ते फिल्डवरच काम करत असते.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! एप्रिलमध्ये ‘या’ महिलांनाच मिळणार ३००० रुपये, ‘ई-केवायसी’ न केलेल्या महिलांचा बंद होणार लाभ, वाचा...

उज्ज्वला योजनेच्या महिलांच्या डोळ्यात धूर! ऑनलाइन बुकिंगसाठी ४५ दिवसांची अट; अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय, पण अंमलबजावणी कागदावरच, वाचा...

Paneer Jowar Paratha: उन्हाळ्यात हलका पण पौष्टिक नाश्ता हवा असेल तर घरच्या घरी बनवा स्वादिष्ट पनीर ज्वारी पराठा

अग्रलेख : भारत- चीन व्यापाराचा नवा अध्याय

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १४ मार्च २०२६ ते २० मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT