पुणे

मतदान केंद्रावर मोबाईल वापरास बंदी

CD

बारामती, ता. ६ : जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाकरिता तालुक्यात ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मोबाईल वापरण्यास प्रतिबंध घालण्यात येत असून निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांतता, निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्निल रावडे यांनी केले आहे.
पक्ष आणि उमेदवारांनी मतदान केंद्रापासून २०० मीटर लांब तात्पुरत्या कार्यस्थानी (उमेदवार, पक्षामार्फत चिठ्ठी वाटपाकरिता लावण्यात येणारे टेबल) विनाकारण गर्दी होणार नाही तसेच त्याठिकाणी कोणतेही भित्तिपत्रक, ध्वज, चिन्हे किंवा इतर प्रचार साहित्य लावू नये तसेच कोणत्याही खाद्यपदार्थाचे वाटप केले जाणार नाही किंवा गर्दी होईल अशी कोणतीही कृती केली जाणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रामध्ये निवडणूक चिन्ह, पक्ष, उमेदवाराचे नाव असलेले कोणतेही प्रचार साहित्य यामध्ये चिन्ह छपाई केलेले टी शर्ट, टोप्या, उपरणे तसेच छापील चिठ्ठ्या आदी आणता येणार नाही.
उमेदवार, उमेदवाराचा निवडणूक प्रतिनिधी यांना मतदानाच्या निरीक्षणासाठी मतदान केंद्राच्या आत ३ मतदाराचे मतदान होईपर्यंतच थांबता येईल, त्यानंतर उमेदवाराने मतदान केंद्राच्या बाहेर पडावे. उमेदवार, उमेदवाराच्या निवडणूक प्रतिनिधीस एका मतदान केंद्रामध्ये संपूर्ण मतदानाच्या कालावधीत जास्तीत जास्त तीन वेळा जाता येईल.
मतदानाच्या दिवशी वाहनाच्या वापराबाबत राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशाचे पालन करुन सर्व पक्षांचे उमेदवार व कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे. वाहन परवाना वाहनांच्या दर्शनी भागांवर ठळकपणे लावावे. मतदानाच्या दिवशी प्रत्येक उमेदवारास स्वतःच्या किंवा निवडणूक प्रतिनिधीच्या वापरासाठी दोन वाहने वापरण्याचा अधिकार असेल. ही वाहने त्याच्या मतदारसंघातच वापरता येतील. कोणत्याही उमेदवारास अथवा पक्षाला मतदारांची ने-आण करण्यासाठी कुठल्याही वाहनाचा वापर करता येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Policy : ऑनलाइन फसवणुकीत तुमच्या पैशांचे नुकसान झाले? घाबरू नका, RBI देणार ₹25,000 पर्यंत भरपाई! काय आहे मोठा निर्णय?

आणि भरत जाधवमुळे मकरंद अनासपुरेंनी मिशी काढली.... 'साडे माडे तीन'च्या वेळेचा न ऐकलेला किस्सा

Mumbai Crime : मुंबईत वन्यप्राण्यांची तस्करी उघड? जुहूत घरातून जिवंत मगरीसह कासव जप्त; २९ वर्षीय इम्रान शेख पोलिसांच्या ताब्यात

अशोक सराफांची 'प्रियतमा' जगतेय हलाखीत आयुष्य ! कशी झाली 'ही' अवस्था जाणून घ्या

Leopard Attack Sangli : 6 वर्षाच्या चिमुरड्याला ठार करणारा नरभक्षक बिबट्या जेरबंद; पिंजऱ्यात कैद करुन वन विभागाने कुठे नेले त्याला...

SCROLL FOR NEXT