बारामती, ता. ५ : अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ फार्मसीमधील डिप्लोमा इन फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी सातारा येथील आयुर्वेदीय अर्कशाळा लिमिटेड येथे नुकतीच शैक्षणिक औद्योगिक भेट आयोजित केली गेली. या भेटीत विद्यार्थ्यांना आयुर्वेदीय औषधनिर्मिती प्रक्रियेचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले. यावेळी कच्च्या मालाची प्रक्रिया, अर्कनिर्मिती, गुणवत्ता नियंत्रण तसेच उत्पादन व्यवस्थापन यासंबंधी तज्ज्ञांनी सविस्तर माहिती दिली. औद्योगिक प्रशिक्षणासोबतच विद्यार्थ्यांनी सज्जनगड येथे किल्ला संवर्धन व वृक्षारोपण उपक्रमात सहभाग घेतला. कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. दर्शन शहा यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची (आंत्रप्रनरशिप) जाणीव निर्माण होईल, असे मत व्यक्त केले. हा उपक्रम अपेक्षा पाटील, सुकन्या परिचारक, प्रांजली खरमाटे, धनश्री नलावडे व ऊर्मिला मस्के, आनंद विठ्ठलदास यांच्या सहकार्याने पार पडला. संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह (वाघोलीकर) व सचिव मिलिंद शाह (वाघोलीकर) यांनी विद्यार्थी-केंद्रित उपक्रमांमुळे गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडतील, असा विश्वास व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.