पुणे

बारामतीत राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व

CD

बारामती, ता. ९ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत झालेल्या पहिल्याच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसने घवघवीत यश प्राप्त केले. जिल्हा परिषदेच्या सर्व सहा जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळविला. गेल्या निवडणुकीतही राष्ट्रवादीने सर्व जागा राखल्या होत्या, यंदाही त्याची पुनरावृत्ती झाली.
सुपे गटात पल्लवी प्रमोद खेत्रे, गुनवडी गटात शुभांगी कचेर शिंदे, पणदरे गटात मंगेश प्रतापराव जगताप, वडगाव निंबाळकर गटात रोहिणी संदीप कदम, निंबूतमध्ये करण संभाजीराव खलाटे, नीरावागज गटामध्ये शिवानी अभिजित देवकाते या राष्ट्रवादीच्या सहाही उमेदवारांचा मोठया मताधिक्याने विजय झाला. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीकडून प्रचारच केला गेला नाही, मतदानाचा टक्काही घटला, पण तरीही बारामतीच्या मतदारांनी नेहमीप्रमाणे अजित पवार यांच्या पक्षाच्या पाठीशी आपली ताकद उभी केली. यंदा अजित पवार यांनी बेरजेचे राजकारण करत विजयी होण्याची क्षमता हा निकष लावत भाजपच्या अभिजित देवकाते यांची पत्नी शिवानी यांना उमेदवारी दिली होती. त्यांचाही मोठ्या मताधिक्याने विजय झाला. जिल्हा परिषदेत सत्ता राखण्याच्या उद्देशाने अजित पवार यांनी बारामती पंचायत समितीत दोन जागा भाजपसाठी सोडल्या होत्या. या रणनीतीमध्ये त्यांना यश मिळाल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा विजय झाला असला व पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व निर्माण झालेले असले तरी ज्यांच्यापुढे काम दाखविण्याची इच्छा होती ते लाडके दादाच निघून गेल्याने विजयी उमेदवार हिरमुसलेले होते. दादांच्या आठवणीने अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला. ज्या नेत्यांनी ही संधी दिली तेच हा विजय बघण्यासाठी नसल्याने त्याचे दुःख विजयी उमेदवारांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreyas Talpade FIR : राजपाल यादवनंतर आता अभिनेता श्रेयस तळपदे अडचणीत ; ‘या’ प्रकरणी दाखल झाला ‘FIR’!

Rahul Gandhi: ''राहुल गांधींना हक्कभंगाची नोटीस देणार'', संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू स्पष्टच बोलले

Pune Trade : आरबीएसएममध्ये ५७ एमओयूवर सह्या; ३१ कोटी रुपये व्यवहारांची नोंद, रॅम्प उपक्रमांतर्गत रिव्हर्स बायर-सेलर मिटला उत्स्फूर्त प्रतिसाद

Ohh Shit...! अभिषेक आजारी, त्यात स्टार फलंदाज झाला जखमी; जसप्रीतच्या यॉर्करवर डावी टाच दुखावली, वेदनेने कळवळला...

Latest Marathi News Live Update : उत्सवांच्या काळात अशांत घटकांशी कठोरपणे वागण्याचे निर्देश: मुख्यमंत्री

SCROLL FOR NEXT