पुणे

व्यवसाय कर रद्द करण्याची व्यापारी महासंघाची मागणी

CD

बारामती, ता. १६ : येथील बारामती व्यापारी महासंघातर्फे व्यवसाय कर रद्द करण्याच्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे. बारामतीचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्याकडे हे निवेदन सोमवारी (ता. १६) व्यापारी बंधूंनी सोपविले.
व्यवसाय कर हा सर्वसामान्य नोकरदार वर्ग, व्यापारी व उद्योजक यांच्यावर अतिरिक्त व अन्यायकारक आर्थिक भार टाकणारा ठरत असल्याचे नमूद करत, सध्याच्या आर्थिक परिस्थितीत वाढत्या खर्चामुळे व्यापारी वर्ग अडचणीत सापडला असून, व्यवसाय करामुळे त्यांचा आर्थिक ताण अधिक वाढत असल्याचे निवेदनात व्यापाऱ्यांनी नमूद केले आहे. व्यवसाय कर रद्द झाल्यास व्यापाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल. तसेच, नवउद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास महासंघाने व्यक्त केला आहे. राज्य सरकारने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुशीलकुमार सोमाणी, जगदीश पंजाबी, स्वप्नील मुथा, प्रशांत चांदगुडे, महेश ओसवाल, मनोज मुथा, प्रवीण आहुजा, सलीम तांबोळी आदी व्यापारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुम्ही फक्त लिहा! गुरुजींनीच बारावीच्या विद्यार्थ्यांना पुरवल्या चीट, ५८१ विद्यार्थ्यांची उत्तरं 'सेम टू सेम'; २६ शिक्षक निलंबित

ज्येष्ठ लेखक सलीम खान यांची तब्येत बिघडली; लीलावती इस्पितळात दाखल; वडिलांच्या काळजीने भाईजानची इस्पितळात धाव

Eknath Shinde: पहलगाममध्ये मृत्युमुखी जगदाळेंच्या मुलीस सेवेत घ्या; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुणे महापालिकेस निर्देश!

Satara Crime: फलटणमधील दोघे तडीपार; सातारा पोलिस अधीक्षकांची कारवाई, विविध ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल!

T20 World Cup: कॅनडाच्या युवराजचा विश्वविक्रम! ११ चौकार, ६ षटकार अन् न्यूझीलंडविरुद्ध शतक, सुरेश रैनाचाही रेकॉर्ड मोडला

SCROLL FOR NEXT