पुणे

बारामतीत ५७ वर्षांनंतर भेटले माजी विद्यार्थी

CD

बारामती, ता. १६ : येथील मएसो शाळेतील वर्ष १९६९मधील मॅट्रिक बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा १७ व १८ जानेवारीला उत्साहात पार पडला. तब्बल ५७ वर्षांनंतर एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेप्रति कृतज्ञता व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
पहिल्या दिवशी शाळेत फेटे बांधून, फुलांची उधळण व पंचारतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापक मेळकुंदे व शिक्षकांशी माजी विद्यार्थांनी संवाद साधत जुन्या आठवणी कथन केल्या. राष्ट्रगीत, प्रार्थना व सरस्वती वंदनेनंतर वर्गात बसून विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. दिवंगत शिक्षकांना आदरांजली अर्पण केली. सरस्वती पूजन व मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला.
यानंतर गरगटे फार्म येथे भोजनाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी भिकोबा तांबे सभागृहात हिंदी-मराठी गीतांची मैफल रंगली.
दुसऱ्या दिवशी सहयोग सोसायटी येथे स्वागत समारंभानंतर बारामती दर्शन, विद्या प्रतिष्ठान व विमानतळाला भेट देण्यात आली. निरगुडे येथील शेतभेटीत भोजनाचा आस्वाद घेतला.
यावेळी राष्ट्रपती पारितोषिक विजेते वरिष्ठ पोलिस अधिकारी इसाक बागवान यांनी २६ नोव्हेंबर रोजी मुंबई हल्ल्याच्या अनुभवांचे कथन केले. स्नेहमेळावा आनंददायी वातावरणात संपन्न झाला. आयोजनासाठी शिवाजी कदम, इसाक बागवान, अरविंद लोंढे, जगदीश खंडागळे व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare On NCP: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का? भवितव्य सांगून सुनील तटकरेंचं मोठं वक्तव्य; काय म्हणाले?

ENG vs ITA, T20 WC : इंग्लंडचा Super 8s मध्ये प्रवेश! इटलीने 'इंग्रंजां'ना शेवटपर्यंत झुंजवले, फुटबॉलच्या देशाने जिंकली मनं...

Ratnagiri CCTV Surveillanc : पोलिसांची तिसरी नजर होतेय धूसर; जिल्ह्यातील सीसीटीव्ही कॅमेरे; देखभाल दुरुस्तीचा गंभीर प्रश्न

Malegaon News : आता अवघ्या महाराष्ट्रात राबवणार 'मालेगाव शैक्षणिक पॅटर्न'; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मोठी घोषणा

Sunil Tatkare: अजितदादांचं विमान पाडलं की पडलं? तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT