पुणे

बारामतीत राष्ट्रवादीकडून मतदारनोंदणी मोहीम

CD

बारामती, ता. १८ : आगामी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी नवीन मतदारनोंदणीसाठी बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेचा प्रारंभ बुधवारी (ता. १८) शारदा प्रांगणानजीक करण्यात आला.
यावेळी बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव, उपनगराध्यक्षा श्र्वेता नाळे, गटनेते संजय संघवी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष किरण इंगळे, महिलाध्यक्षा अनिता गायकवाड, युवकाध्यक्ष अभिजित घाडगे, बारामती बँकेचे अध्यक्ष ॲड. शिरीष कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष सुभाष सोमाणी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठीची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाली आहे. या यादीमध्ये आपले नाव समाविष्ट असल्याची खात्री आताच करून घ्यावी, जेणेकरून मतदानाच्या दिवशी अडचण होणार नाही, असे आवाहन बारामती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी शारदा प्रांगणासमोर कक्ष सुरू केला आहे.
दरम्यान, मतदारयादीत नव्याने नाव समाविष्ट करण्यासाठी नवमतदारांनीही २५ फेब्रुवारीपर्यंत संपर्क साधावा, जेणेकरून त्यांचे नाव यादीत समाविष्ट करणे शक्य होणार असल्याचे किरण इंगळे यांनी स्पष्ट केले.

14472

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG टंचाई टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय! अन्न आता इंडक्शन कुकरवर शिजवणार; स्वयंपाकघरात ‘फ्लेमलेस’ क्रांती

BAN vs PAK : हा, घे बॉल... कर OUT! पाकिस्तानी फलंदाजाचा मुर्खपणा जगाने पाहिला... बाद देताच बांगलादेशच्या खेळाडूला भिडला Video Viral

Uttarakhand Travel Guide: हिमालयात लपलेलं स्वर्गासारखं ठिकाण! चोपटा व्हॅलीला का म्हणतात ‘मिनी स्वित्झर्लंड’?

T20 World Cup गाजवणाऱ्या गोलंदाजाचा पाकिस्तानला ठेंगा! IPL 2026 मध्ये KKR कडून खेळण्यासाठी तयार

Navi Mumbai: ऐरोलीत भीषण अपघात! जेसीबी आणि दुचाकीची जोरदार धडक, दोन तरुणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT