बारामती, ता. २२ : दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संशयास्पद अपघाती मृत्यू प्रकरणाची चौकशी निष्पक्ष व जलदगतीने करण्यात यावी, या मागणीसाठी सोमवारी (ता. २३) बारामतीच्या प्रांत कार्यालयात शासनाला निवेदन सादर करण्यात येणार आहे.
या घटनेमुळे बारामतीकरांच्या मनात तीव्र भावना व्यक्त होत असून, अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अपघाताबाबत सत्य समोर यावे, चौकशी पारदर्शक पद्धतीने व्हावी आणि नागरिकांच्या मनातील संभ्रम दूर व्हावा, अशी सामूहिक अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सोमवारी सकाळी १० वाजता प्रांत कार्यालय, बारामती येथे संबंधित निवेदन देण्यात येणार असून, यावेळी अजितदादा प्रेमी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. ही भूमिका कोणाविरुद्ध नसून सत्य व पारदर्शकतेसाठी असल्याचेही आयोजकांनी स्पष्ट केले आहे.