पुणे

बारामतीत हॉटेल बिलावरून एकावर प्राणघातक हल्ला

CD

बारामती, ता. २३ : हॉटेलच्या बिलावरून झालेल्या वादातून मोरगाव रस्ता परिसरात एका ५३ वर्षीय व्यक्तीवर कुऱ्हाड आणि लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून, जखमीवर तातडीने उपचार केल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत. मुख्य आरोपीसह अन्य दोघे अद्याप फरार आहेत.
या प्रकरणी जखमी महेंद्र धोंडिबा गायकवाड (वय ५३, रा. खांडज) यांनी फिर्याद दिली आहे. विक्रम जगताप (रा. खांडज), जयदीप भोसले (रा. पाहुणेवाडी) यांना ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी अक्षय जगताप व महादेव जाधव अद्याप फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी (ता. २१) रात्री हॉटेल बिलावरून झालेल्या वादाचा राग धरून, अक्षय जगताप व त्याच्या साथीदारांनी रविवारी (ता. २२) दुपारी मोरगाव रस्त्यावरील ग्लोबल हॉटेलसमोर गायकवाड यांना गाठले. आरोपींनी लाकडी दांड्याची कुऱ्हाड आणि रॉडने केलेल्या हल्ल्यात गायकवाड यांच्या पायाला व छातीला गंभीर इजा झाली. यावेळी आरोपींनी नागरिकांना धमकावून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड व निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी गायकवाड यांना स्वतः रुग्णालयात दाखल केले, ज्यामुळे त्यांचा जीव वाचला. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल व अतिरिक्त अधीक्षक गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: ''..तोपर्यंत मी शर्टचं वरचं बटण लावणार नाही'', विधानसभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

भाजपच नाही, सोनिया गांधींनीही शब्द दिला होता! २०२७ पूर्वी विदर्भ वेगळा होणार, विदर्भ राज्य आंदोलन समितीने व्यक्त केला विश्वास

आम्ही आमचं बाळ गमावलं... लोकप्रिय मराठी इन्फ्लूएन्सर कपलला धक्का; म्हणाले- ५ व्या महिन्यात समजलं की...

Meat And Fish Ban: मांस आणि माशांच्या खुल्या विक्रीवर बंदी! आता परवानगी असेल तरच दुकान चालणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

Mumbai: मुंबईतील हवा ‘भीषण’ स्तरावर; बांधकामांना आठवडाभर स्थगितीची मागणी; पालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात काय लिहिलंय?

SCROLL FOR NEXT