पुणे

बारामतीच्या आचार्य ॲकेडमीचे ‘जेईई’च्या मुख्य परीक्षेमध्ये यश

CD

बारामती, ता. २३ : ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’मार्फत (एनटीए) घेण्यात आलेल्या जेईई मेन (सत्र एक) परीक्षेत आचार्य ॲकेडमीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.
सत्र एकचा निकाल १६ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला. या परीक्षेत आचार्य ॲकेडमीच्या तब्बल ९८हून अधिक विद्यार्थ्यांनी यश मिळविले. सर्वाधिक पर्सेंटाइल गुण मिळविणाऱ्यांमध्ये समर्थ कुसेकर (९९.७५), श्रेयस मलशेट्टी (९९.६३), सानिका टेकवडे (९९.५९), तनय महाजन (९९.३४) आणि आण्णासाहेब बरवे (९९.१६) यांचा समावेश आहे. तसेच, अरुल व्यावहारे (९८.९३), मयुरेश नांदे (९८.८३), आर्यन जाधव (९८.७०), मृणाल जगताप (९८.६६), संस्कृती जामदाडे (९८.६६), हृदय गवळी (९८.६१), तन्मय शिंदे (९८.६१), मनस्वी घोडके (९८.४०), अरमान अत्तार (९८.२३), देविका कौशल (९८.११), अवधूत धुमाळ (९७.९४), रोहित यादव (९७.८४), सुयश नवले (९७.७८) आणि स्वराज वाघ (९७.७६) यांनीही उच्च पर्सेंटाइल मिळवत अकॅडमीचा लौकिक वाढविला. एकूण ३०० विद्यार्थ्यांपैकी ९८हून अधिक विद्यार्थ्यांनी ९०पेक्षा जास्त पर्सेंटाइल मिळविले आहेत.
अवघ्या आठ वर्षांत यशस्वी विद्यार्थी घडविणारी संस्था म्हणून आचार्य अकॅडमीने बारामतीसह पुण्यातील वाकड व रहाटणी येथे आपल्या शाखा कार्यरत केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थापक प्रा. ज्ञानेश्वर मुटकुळे यांनी सर्व विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

Latest Marathi News Live Update : जेव्हा कधी काहीतरी चांगले घडते, तेव्हा विरोधक तक्रारी करतातच, नारी शक्ती वंदन विधेयकावर कंगना रानौत यांची प्रतिक्रिया

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Aarey Milk: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘आरे’ दूध पुन्हा बाजारात येणार, तारीख आली समोर, स्टॉलधारकांना दिलासा

SCROLL FOR NEXT