पुणे

बारामती तालुक्यातील यात्रा साध्या पद्धतीने करण्याचे आवाहन

CD

बारामती, ता. २४ : ‘‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनामुळे यंदा बारामती तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील गावागावांतील ग्रामस्थांनी यंदाच्या यात्रा-जत्रा साध्या पद्धतीने फक्त नैवेद्य दाखवून साजऱ्या कराव्यात,’’ असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्‍वास देवकाते व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांनी केले आहे.
बारामतीत मंगळवारी (ता. २४) घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे आवाहन केले. अजित पवार यांनी बारामती तालुक्यासह पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या चाळीस वर्षात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या अकाली मृत्यूने कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी कोणत्याही प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित न करता देवाला नैवेद्य दाखवून यात्रा करावी, असे आवाहन देवकाते व बांदल यांनी या पत्रकार परिषदेदरम्यान केले आहे. दरम्यान, नीरावागज गावामध्ये यात्रेनिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेणार असल्याचेही देवकाते यांनी याप्रसंगी जाहीर केले.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; २१०० रुपये कधीपासून मिळणार?

शेवटी त्यांचे सीन बसूनच व्हायचे... 'आई कुठे काय करते' करताना अशी झालेली कांचन आजींची अवस्था; मिलिंद गवळींचा खुलासा

Latest Marathi News Live Update : जळगाव जिल्ह्यात हरभरा काढणीला वेग, उत्पन्नातही मोठी वाढ; बळीराजा सुखावला

डॉक्टरांचे चुकीचे उपचार अन् शरीरभर इन्फेक्शन; थोडक्यात वाचली CID फेम मराठी अभिनेत्री "म्हणून मुलाला जन्म.."

Railway recruitment 2026 : रेल्वेमध्ये नोकरीची मोठी संधी!, ११ हजारांहून अधिक ‘असिस्टंट लोको पायलट’ पदांवर भरती

SCROLL FOR NEXT