बारामती, ता. २८ : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी बारामती नगरपरिषदेने दर शुक्रवारी महास्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत शुक्रवारी (ता. २७) रुई परिसरात पहिले स्वच्छता अभियान राबविले गेले.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यसंस्कार स्थळी त्यांना अभिवादन करून या अभियानाचा प्रारंभ केला गेला. अजित पवार यांना स्वच्छतेची कमालीची आवड होती, त्याच भावनेतून नगराध्यक्ष सचिन सातव, आरोग्य समिती सभापती नवनाथ बल्लाळ यांच्या पुढाकारातून हे अभियान हाती घेण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती स्वच्छ व सुंदर राहावी या साठी प्रयत्न केला जाणार आहे.
केवळ नगरपरिषद प्रशासनच नाही तर लोकसहभागातून स्वच्छता अभियान हाती घेत लोकांनाही यात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न या अभियानामार्फत नगराध्यक्षांनी केला आहे. दर शुक्रवारी हा उपक्रम राबविला जाणार आहे.
यावेळी नगराध्यक्ष सचिन सातव, उपनगराध्यक्षा श्र्वेता नाळे, आरोग्य समिती सभापती नवनाथ बल्लाळ, स्थानिक नगरसेवक विष्णूपंत चौधर, संपदा चौधर, मुख्याधिकारी पंकज भुसे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष किरण इंगळे, युवकाध्यक्ष अभिजित घाडगे, नगरसेवक अमोल कावळे, आलताफ सय्यद, विशाल हिंगणे, प्रवीण माने, गणेश जोजारे, अनुप्रिता ताबे, आरोग्य अधिकारी यशराज बनसोडे, आरोग्य निरीक्षक स्वरूप अहिवळे, अजय लालबिगे, माजी नगरसेवक विजय खरात, अजिनाथ चौधर, पांडुरंग चौधर, मच्छिंद्र चौधर आणि नगरपरिषद कर्मचारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
महास्वच्छता अभियानाच्या माध्यमातून बारामती स्वच्छ, सुंदर आणि हरित ठेवण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येत सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. हा उपक्रम दादांच्या स्वप्नपूर्तीकडे नेणारा महत्त्वाचा टप्पा आहे.
- सचिन सातव, नगराध्यक्ष, बारामती नगर परिषद
स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. महास्वच्छता अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करून स्वच्छ, निरोगी आणि सुंदर बारामती घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- नवनाथ बल्लाळ- आरोग्य सभापती, बारामती नगर परिषद
14529
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.