पुणे

बारामतीत पथदिव्यांच्या नियोजनाचा बोजवारा

CD

बारामती, ता. २७ : बारामती शहरातील विविध रस्त्यांवरील पथदिवे आणि सुशोभीकरण दिव्यांच्या वेळेबाबत नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमआयडीसी यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नियोजनाअभावी अनेक ठिकाणी पहाटेपर्यंत अंधार असतो, तर काही ठिकाणी विनाकारण दिवे सुरू राहिल्याने वीजबिलाचा बोजा वाढत आहे.
तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून शहरातील भिगवण रस्ता, हॅपी स्ट्रीट, गदिमा ते रुई रुग्णालय रस्ता आणि साठवण तलाव परिसरात आकर्षक दिवे बसवण्यात आले आहेत. मात्र, हे दिवे सुरू आणि बंद करण्याच्या वेळा निश्चित नाहीत. ऋतूंनुसार वेळेत बदल न केल्याने पहाटे व्यायामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना अंधारातून मार्गक्रमण करावे लागते. अक्षय गार्डन ते रिलायन्स पेट्रोलपंप दरम्यानच्या सेवा रस्त्यावर महिनाभरापासून दिवे बंद असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.
या दिव्यांच्या देखभालीची जबाबदारी नेमकी कोणत्या विभागाची आहे, याबाबत स्पष्टता नसल्याने तक्रार कोणाकडे करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासकीय दिरंगाईमुळे वीजबिलातही वाढ होत आहे. संबंधित विभागांनी संयुक्त बैठक घेऊन यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी बारामतीकरांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Transport: महाराष्ट्रात बेकायदेशीर वाहतुकीवर सर्जिकल स्ट्राईक! राज्यव्यापी धडक मोहीम सुरू; अंमलबजावणी कधीपासून?

Horscope : उद्यापासून धनदौलत योग! 'या' 5 राशींचा सुवर्णकाळ सुरू; नोकरी-व्यवसायात मोठी संधी, अडकलेल्या कामात मिळेल नशिबाची साथ

फी न भरल्याने आठवीतील विद्यार्थ्याला परीक्षेस मज्जाव, शाळेच्या कारवाईविरोधात कडक पाऊल उचलण्याचा इशारा, पनवेलमध्ये नेमकं काय घडलं?

Khutbav News : शेतकरी महिलेने शेतीकाम करत मराठी साहित्य क्षेत्रामध्ये वाजवला गौरवाचा डंका

Latest Marathi News Live Update : त्र्यंबकेश्वरमधील संत निवृत्तीनाथ समाधी मंदिर ट्रस्टला राज्यसरकारकडून ५० लाख रुपयांची मदत

SCROLL FOR NEXT