पुणे

गरज भासल्यास जागतिक संस्थेमार्फत चौकशी करा

CD

बारामती, ता. २८ : "तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, हीच राष्ट्रवादी काँग्रेसची ठाम भूमिका आहे. या तपासात कोणत्याही त्रुटी राहू नयेत आणि गरज भासल्यास जागतिक स्तरावरील नामांकित संस्थेमार्फत याची चौकशी करण्यात यावी," असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी केले.
अजित पवार यांच्या निधनास शनिवारी (ता. २८) एक महिना पूर्ण झाल्यानिमित्त, बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर असलेल्या स्मृतीस्थळास तटकरे यांनी अभिवादन केले. यावेळी पार्थ पवार आणि जय पवार यांनीही स्मृतीस्थळावर जाऊन श्रद्धांजली वाहिली. माध्यमांशी बोलताना तटकरे म्हणाले की, या प्रकरणातील सर्व संशयास्पद बाबींचा विचार करून केंद्र आणि राज्य स्तरावर तपास सुरू आहे, त्यातून सत्य लवकरच समोर येईल. तसेच अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी एकत्रित घेतला, यावर ज्याला टीका करायची आहे ते करू शकतात, पण आम्ही प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले. अजित पवारांचे उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा पवारांनी जबाबदारी घ्यावी ही विनंती त्यांना केली व त्यांनीही धीरोदत्तपणे ती स्वीकारली, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रोहित पवारांच्या इशाऱ्यावर प्रत्युत्तर
आमदार रोहित पवार यांनी दिलेल्या इशाऱ्याबाबत विचारले असता, तटकरे म्हणाले की, "२०१९ मध्ये भाजपचे तिकीट मागण्यासाठी कोण कुठे गेले होते, याची सर्व माहिती अजित पवार आणि माझ्याकडे होती. जे आज टीका करत आहेत, ते पूर्वी अजित पवारांवर कशी प्रखर टीका करायचे हे राज्याने पाहिले आहे. योग्य वेळ आल्यावर मी बोलेन, कारण मी अनेक घटनांचा साक्षीदार आहे. विलीनीकरणाबाबत काही वरिष्ठ नेते अंत्यविधीच्या दिवशी बोलत होते, पण सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करा, असे एकही जण बोलले नाही याची आठवण तटकरे यांनी करून दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT