बारामती, ता. ३ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनामुळे बारामती शहरात शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर येणारी रमजान ईद साध्या व संयमी पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय बारामतीतील मुस्लिम समाजाने घेतला आहे.
“ईद दरवर्षी उत्साहात साजरी होईल; मात्र अजितदादा पवार पुन्हा कधीच येणार नाहीत,” अशा भावना व्यक्त करत समाजबांधवांनी फटाक्यांची आतषबाजी, डीजे, ईद मिलन समारंभ, फ्लेक्स आदी सार्वजनिक कार्यक्रम टाळण्याचे एकमताने ठरविले आहे.
शांततेचा व सामाजिक सलोख्याचा संदेश देत ईद साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अजितदादा पवार यांनी सर्व समाजघटकांना बरोबर घेऊन विकासकामांना गती दिली. सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिल्याची भावना व्यक्त करत त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा निर्णय घेतल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.