पुणे

बारामती वैद्यकीय महाविद्यालयास ''दादां''चे नाव

CD

बारामती, ता. ४ : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित सर्वोपचार रुग्णालय तसेच मेडद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयास दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास या पूर्वी दिलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे नाव कायम राहणार असून या अंतर्गत असलेल्या रुग्णालयास स्व. अजितदादा पवार सर्वोपचार रुग्णालय असे नाव देण्याची अधिसूचना वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने सोमवारी (ता. २) जारी केली. मेडद येथील आयुर्वेदिक महाविद्यालयाचे देखील स्व. अजितदादा पवार शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय असे नामकरण करण्यात येणार आहे. या दोन्हीही रुग्णालयांच्या उभारणीत अजित पवार यांचे मोलाचे योगदान होते. या दोन्हीही वास्तूची संकल्पना मांडण्यापासून ते प्रत्यक्ष उभारणीपर्यंत असंख्य वेळा अजित पवार यांनी या दोन्ही ठिकाणी भेटी देऊन सूचना केलेल्या होत्या. या दोन्हीही वस्तूंमुळे केवळ बारामतीच नव्हे तर पुणे, सातारा, सोलापूर व अहिल्यानगर या चार जिल्ह्यांतील रुग्णांची मोठी सोय झालेली असून शासकीय दरामध्ये रुग्णांवर उपचार होत आहेत. विविध तपासण्या व शस्रक्रिया देखील शासकीय दरात होतात. सीटीस्कॅन व एमआरआय सारख्या सुविधा शासकीय दरात लोकांना उपलब्ध झाल्या आहेत.

आदेशात नमूद केले आहे की...
स्व. अजित (दादा) अनंतराव पवार यांनी उपमुख्यमंत्री तसेच विविध महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री व वित्त मंत्री म्हणून कार्यरत असताना राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये आरोग्य क्षेत्राला विशेष प्राधान्य दिले होते. जिल्हास्तरीय वैद्यकीय पायाभूत सुविधा बळकट करणे, नवीन वैद्यकीय व आयुर्वेद महाविद्यालयांची स्थापना करणे, आधुनिक वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता वाढविणे तसेच ग्रामीण भागामध्ये तृतीयस्तरीय आरोग्यसेवेचा विस्तार करण्यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. त्यांच्या पुढाकारामुळे बारामती परिसरातील आरोग्य व शैक्षणिक विकासास गती प्राप्त झाली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील बारामती येथे वैद्यकीय शिक्षणाच्या गरजांची पूर्तता करणाऱ्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय व शासकीय आयुर्वेद महाविद्यालये व संलग्नित रुग्णालयांचे नामाधिकरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या नुसार हे नामकरण करण्यात आले आहे.

इराणसोबतचा संघर्ष भारत अन् चीनला रोखण्यासाठी, इराणच्या अधिकाऱ्याने सगळंच सांगितलं, अमेरिकेला सुनावलं

Safe Investment : अमेरिका–इराण युद्धाने शेअर बाजार हादरला! घाबरू नका… या 6 गुंतवणुकीत तुमचे पैसे राहतील सुरक्षित

Latest Marathi News Live Update : राज्यसभेबाबतचा निर्णय संध्याकाळपर्यंत घेतला जाईल- संजय राऊत

Budget 2026: यंदा राज्य सरकारची कसरत! तूट, कर्जामुळे योजना व विकासाचा समतोल साधण्याचे आव्हान

Nashik Municipal Corporation : नाशिक मनपाचा शेअर बाजारात डंका! २०० कोटींच्या 'ग्रीन बॉण्ड'ला ५४० कोटींचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT