पुणे

प्रेमी युगुलाला लुटणारे तिघे गजाआड

CD

बारामती, ता. ३ : येथील तांदूळवाडी येथील एलसी कंपनी लेक परिसरात प्रेमी युगलावर कोयत्याने वार करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लुटणाऱ्या तिघांना बारामती तालुका पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. आरोपींकडून ३ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांदूळवाडी विमानतळ रस्त्यालगत असलेल्या एलसी कंपनी लेक येथील मोकळ्या जागेत फिर्यादी संतोष रायनवार (बदलेले नाव, वय २६, मूळ नागपूर, सध्या रा. बारामती) हे त्यांच्या मैत्रिणीसोबत बसले होते. त्यावेळी तोंडाला मास्क व रुमाल बांधलेल्या तिघांनी लोखंडी सत्तूर व कोयत्याचा धाक दाखवत पैशांची मागणी केली. फिर्यादीने विरोध केल्यावर एका आरोपीने त्यांच्या डाव्या पायावर कोयत्याने वार करून जखमी केले. त्यानंतर आरोपींनी तीन लाखांची सोनसाखळी व इतर दागिने मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेतला. याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास करत प्रसाद गणपत भोसले (वय २४), धैर्यशील प्रशांत आगवणे (वय १९) व कृष्णा नाना गाडेकर (वय २१, सर्व रा. तांदुळवाडी, ता. बारामती) यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक युवराज पाटील, पोलिस अंमलदार सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, मनोज पवार, जितेंद्र शिंदे, राजू बन्ने व पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bar Association Election : महाराष्ट्र व गोवा वकील परिषद निवडणुकीत पुण्याचा दबदबा; २३ पैकी तब्बल आठ उमेदवार विजयी

US Iran Conflict: अमेरिका-इराणचं पुन्हा पेटलं! यूएसच्या तळांवर इराणने डागले क्षेपणास्त्र; दोन्ही देशांमधला युद्धविराम धोक्यात

Karad Crime : वैवाहिक वादातून पत्नीने भावाच्या मदतीने अभियंता पतीला कट रचून संपविले

Kuno Viral animal : दशकांनंतर कूनोच्या जंगलात दिसला रहस्यमयी 'प्राणी! कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झाली पहिली झलक, मुख्यमंत्र्यांनी शेअर केले photo

मोदी सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला; यशोमती ठाकूरांचा हल्लाबोल, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी अमरावतीत मशाली पेटल्या

SCROLL FOR NEXT