पुणे

बारामती शहर राष्ट्रवादीची कार्यकारिणी जाहीर

CD

बारामती, ता. ४ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती शहर कार्यकारणीची घोषणा करण्यात आली आहे. शहराध्यक्ष ॲड. किरण इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयात झालेल्या बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच युवा नेते पार्थ पवार आणि जय पवार यांच्या सूचनेनुसार ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. स्थानिक पातळीवर पक्ष संघटना अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने विविध पदांवर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे शहराध्यक्ष इंगळे यांनी सांगितले. या बैठकीस माजी नगराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, युवक अध्यक्ष अभिजित घाडगे, शहर पक्ष कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी सुरज देवकाते तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, महिला शहराध्यक्ष, युवती शहराध्यक्ष, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष व इतर काही सेलचे अध्यक्ष लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे शहराध्यक्ष ॲड. किरण इंगळे यांनी सांगितले.
अशी आहे कार्यकारिणी
कार्याध्यक्ष : गणेश सोनवणे, संभाजी माने, सयाजी गायकवाड व रियाज शेख. उपाध्यक्ष : ऋषिकेश निलाखे, नानासाहेब भगत, संतोष टाटीया, छगन आटोळे, सचिन काकडे, संजय गुळुमकर, सोमनाथ नाळे व अन्सार आत्तार. सरचिटणीस : ॲड. शिवकांत वाघमोडे, शैलेश वणवे, सुशील राठोड, धनंजय जमदाडे, वैभव बोरसे, मुकुंद तारू, ॲड. वैभव काळे व रोहित शहा. चिटणीस : सुधीर पोतदार, सचिन सकट, प्रशांत महाडिक, नवनाथ चौधर, राजू मदारी, सुभाष मोहिते, कैलास शिंदे, शंतनू बनकर.
याशिवाय विविध विभागीय सेलच्या, अध्यक्षपदीही नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
ओबीसी सेल अध्यक्ष : नवनाथ अपुणे, उद्योग व व्यापार सेल अध्यक्ष : प्रवीण आहुजा, आयटी सेल अध्यक्ष : संजय दुधाळ, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष : गजानन गायकवाड, ग्राहक संरक्षण समिती सेल अध्यक्ष : हारून शेख, सेवा दल अध्यक्ष : ॲड. धीरज लालबिगे, विद्यार्थी सेल अध्यक्ष : मेघराज माने.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Glenn Maxwell : ग्लेन मॅक्सवेलची आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० मधून निवृत्ती ? ऑस्ट्रेलियाच्या स्टार खेळाडूने दिले अपडेट्स

Latest Marathi News Live Update : नोकरीच्या आमिषाने १६ जणांची फसवणूक

Ladki Bahin Yojana : केवायसी करूनही मिळेना लाडक्या बहिणींना दरमहा अनुदान

Iran-Israel War: इराणच्या युद्धात मुंबईच्या तरुणाचा मृत्यू; ड्रोन हल्ल्यात भारतातील तिघे ठार

Mumbai News: व्हॉट्सॲप चॅट घटस्फोटाचे कारण असू शकत नाही - उच्च न्यायालय

SCROLL FOR NEXT