पुणे

बारामतीत नगरपरिषद शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न

CD

बारामती, ता. ४ : नगरपरिषद शाळांमधील पायाभूत सुविधा सुधारून शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या उद्देशाने बारामती नगरपरिषदेच्या नगरसेवकांकडून शाळांची नुकतीच प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष सचिन सातव यांनी यासंदर्भात सूचना दिल्या. त्यानुसार उपनगराध्यक्ष तथा शिक्षण व क्रीडा सभापती श्वेता नाळे यांच्यासह शिक्षण समिती सदस्य नगरसेवक शर्मिला ढवाण, मंगल किर्वे, पूनम चव्हाण, विशाल हिंगणे, गोरख पारसे, सोमनाथ गजाकस व अमोल कावळे यांनी नगरपरिषद शाळांना भेट देत सविस्तर पाहणी केली. या वेळी शाळांमधील पायाभूत सुविधा, स्वच्छता व्यवस्था, वर्गखोल्यांची स्थिती, क्रीडा साहित्य, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध शैक्षणिक साधनांची तपासणी करण्यात आली. ज्या ठिकाणी अडचणी आढळल्या त्यांची नोंद करून त्या दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. नगरपरिषदेकडून सर्व आवश्यक पायाभूत सुविधा पूर्ण झाल्यानंतर शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावणे तसेच विद्यार्थी पट वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

बारामतीतील प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे वातावरण मिळणे ही नगरपरिषदेची जबाबदारी आहे. शाळांमधील पायाभूत सुविधा तातडीने सुधारून शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी ठोस कृती आराखडा राबविण्यात येईल.
- सचिन सातव, नगराध्यक्ष, बारामती

शाळांमध्ये प्रत्यक्ष पाहणी केल्याने अडचणींचे वास्तव चित्र स्पष्ट झाले आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी टप्प्याटप्प्याने काम सुरू केले आहे. सुविधा पूर्ण झाल्यानंतर दर्जेदार शिक्षण व पटवाढ यावर भर दिला जाईल.
- श्वेता नाळे, उपनगराध्यक्ष, बारामती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Khamenei: खामेनेई जिवंत? परराष्ट्रमंत्र्यांच्या दाव्याने जगभरात खळबळ; अजूनही पार्थिवावर अंत्यसंस्कार का झाले नाहीत?

Kannad Politics : कन्नडमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार; डॉ. तृप्ती दिलीपसिंग राजपूत यांचा भाजपात प्रवेश

Finn Allen Century: १८ चेंडूंत ८८ धावा! फिन अ‍ॅलनचा T20 World Cup स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड; ख्रिस गेलचा विक्रम मोडलाच, शिवाय नोंदवले ५ मोठे पराक्रम, आफ्रिकेला बेक्कार झोडला...

Lakhandur News : चोरीचा गुन्हा उघडकीस आल्याने बदनामीच्या भीतीपोटी मुलीने संपविले जीवन

Murud Crime : मुरुड येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तिघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT