पुणे

बारामतीत ''डिजिटल अरेस्ट''च्या नावाखाली ४५ लाखांची लूट

CD

बारामती, ता. ५ : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून डोर्लेवाडी (ता. बारामती) येथील एका ७४ वर्षीय ज्येष्ठ महिलेची ४५ लाख ६० हजार रुपयांची सायबर फसवणूक झाली आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शकुंतला उद्धव खर्डे (वय ७४) यांना १४ ते २७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल केला. स्वतःला ‘संदीप पाटील’ नावाचा पोलिस अधिकारी सांगणाऱ्या या व्यक्तीने शकुंतला यांच्याविरुद्ध अटक वॉरंट असल्याचे सांगून त्यांना ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती घातली. मानसिक दबावाखाली येऊन शकुंतला यांनी आपल्या मुदत ठेवी (एफडी) मोडून एकूण ४५ लाख ६० हजार रुपये आरोपीने सांगितलेल्या विविध बँक खात्यांवर वर्ग केले.
पैसे पाठवल्यानंतर संबंधित व्यक्तीशी संपर्क तुटल्याने आपली फसवणूक झाल्याचे शकुंतला यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
दरम्यान, कोणतीही व्यक्ती स्वतःला पोलिस, सीबीआय, ईडी किंवा न्यायालयाचा अधिकारी असल्याचे सांगून दूरध्वनी किंवा व्हिडिओ कॉलवर ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवत असल्यास त्यावर विश्वास ठेवू नये. अशा प्रकारे भीती दाखवून पैसे मागितल्यास तत्काळ १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन बारामती शहर पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sukhoi Missing: मोठी बातमी! भारतीय वायुसेनेचं अत्यंत शक्तिशाली सुखोई फायटर जेट बेपत्ता; शोध मोहीम सुरु

Pune News : भाजप नगरसेवकांच्या निर्णयामुळे केंद्राच्या प्रकल्पाला अडथळा, ८ कोटींचा निधी परत जाण्याची शक्यता

T20 WC, IND vs ENG: अक्षर पटेल मागे पळाला अन् सूर मारत अफळातून कॅच पकडला, गंभीरही खूश अन् बुमरहाचाही मोठा विक्रम

T20 WC, IND vs ENG SF: ३७ चौकार-षटकार… वर्ल्ड कप नॉक आऊटमधील सर्वोच्च धावसंख्या... संजू सॅमसनने हिटमॅन रोहितचा विक्रम मोडला, भारताचे ७ जबरदस्त विक्रम...

Alandi News : आळंदी इंद्रायणी घाटावर महिलांमार्फत खुलेआम मद्यविक्री, धार्मिक स्थळांचे विडंबन

SCROLL FOR NEXT