बारामती, ता. ५ : बारामती- पारवडी मार्गावर परिटवस्तीनजिक बुधवारी (ता. ४) रात्री झालेल्या अपघातात मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामध्ये वडील व दोन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.
मयूर कोकणे हे आपली पत्नी रूपाली, मुलगी सानवी व दोन वर्षांचा मुलगा कृष्णा यांच्यासह बारामतीहून पारवडीनजिक असलेल्या घरी दुचाकीवरून निघाले होते. परिटवस्तीनजिक समोरून चुकीच्या दिशेने आलेल्या मारुती वॅगनर (क्र. एमएच ४२ बीजे १४०४) या मोटारीने त्यांना समोरासमोर जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात रूपाली कोकणे (वय २५) व सानवी कोकणे (वय ५) या मायलेकींचा मृत्यू झाला. अपघातानंतर मोटार चालकाने गाडी तेथेच सोडून पळ काढल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
अपघातानंतर रूपाली कोकणे व सानवी कोकणे यांना दवाखान्यात दाखल केले होते. मात्र, तेथे त्यांचा झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान, दोन वर्षांच्या कृष्णा या मुलावर पुण्यातील खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. मयूर कोकणे यांनाही गंभीर दुखापत झाली असून, त्यांनाही रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबत सचिन शिवाजी कोकणे यांनी फिर्याद दिली आहे.
14576, 14577
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.