पुणे

‘नीरा-कऱ्हा’ प्रकल्पाची केवळ घोषणाच

CD

बारामती, ता. ७ : ‘‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात नीरा- कऱ्हा उपसा सिंचन प्रकल्पाची घोषणा केली आहे. तथापि या योजनेसाठी निधीची तरतूद मात्र केली नाही. अर्थसंकल्पात तशी तरतूदच दिसत नाही. त्यामुळे ही केवळ घोषणाच असल्याचे सिद्ध होत आहे,’’ असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. तसेच, हा प्रकल्प नेमका कधी व कसा पूर्ण करणार? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
नीरा- कऱ्हा उपसा सिंचन प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेचा उल्लेख करत खासदार सुळे यांनी ट्विट केले असून, ही निव्वळ घोषणा ठरू नये, ठोस निधीची तरतूद करून लवकरात लवकर काम सुरू होण्याच्या दृष्टीने आखणी करावी, म्हणजे बारामती आणि पुरंदर तालुक्यातील अवर्षणग्रस्त नागरिकांत संभ्रम राहणार नाही, अशी मागणीही त्यांनी केली.
याबाबत त्यांनी म्हटले की, बारामती आणि पुरंदर तालुक्यातील अवर्षणग्रस्त गावांतल्या शेतजमिनी ओलिताखाली आणणे, तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नीरा व कऱ्हा नदीच्या पाण्याची महत्वाकांक्षी उपसा सिंचन योजना हे स्व. अजितदादा पवार यांचे स्वप्न होते. या योजनेच्या माध्यमातून या भागातील गावांवरील जिरायती भाग हा शिक्का कायमस्वरूपी पुसून टाकला जाणे शक्य आहे. त्यासाठी अजित पवार प्रयत्नशील होते. दीड महिन्यांपूर्वी बारामती तालुक्यातील कण्हेरी येथे झालेल्या जाहीर सभेत त्यांनी या योजनेचा उल्लेख केला होता. ‘आपण या योजनेसाठी १ हजार कोटी रुपयांची तरतूद करत असून, त्या माध्यमातून सुमारे अडीच टीएमसी पाणी साठविण्याचा प्रयत्न आहे,’ असे त्यांनी सांगितले होते. दुर्दैवाने आज ते आपल्यात नाहीत. त्यांच्या जागी अर्थमंत्री या नात्याने फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यात त्यांनी नीरा- कऱ्हा उपसा सिंचन प्रकल्पाचा उल्लेख केला, मात्र त्यासाठीच्या निधीच्या तरतुदींचा उल्लेख मात्र केला नाही. राज्यातील इतर सिंचन प्रकल्पांच्या घोषणा त्यांनी निधीसहित केल्या आहेत. मात्र, नीरा- कऱ्हा उपसा सिंचन प्रकल्पाबाबत मात्र त्यांनी निव्वळ घोषणाच केल्याचे दिसते आहे. त्यामुळे शासनाची या प्रकल्पाबाबत नेमकी काय भूमिका आहे, याबाबत जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Motor vehicle tax: जुनी वाहने स्क्रॅप केल्यास मोठी करसवलत मिळणार! महायुती सरकारची मोठी घोषणा; प्रदूषण करणारी वाहने बंद करणार

जॉनी लिव्हरच्या लेकाला 12व्या झालेला ट्युमर ! पहिली सर्जरी फेल, दुसरी अमेरिकेत; "त्यावेळी फादरच्या रूपात.."

नागपूरला स्फोटाची राजधानी करायची आहे का? एसबीएल कंपनी स्फोटप्रकरणी अद्याप कारवाई नाही, अनिल देशमुख संतापले...

Latest Marathi News Live Update: कन्नडच्या रस्ते आणि पुलासाठी ३२ कोटींचा निधी मंजूर- आ. संजना जाधव

रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी एक महिन्याची सूट? अमेरिकेच्या दाव्यावर भारत सरकारची स्पष्टता, काय म्हटलं?

SCROLL FOR NEXT