बारामती, ता. ८ : येथील बारामती तालुका पोलिसांनी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार सुरेंद्र रवींद्र काजळे (रा. तांदुळवाडी, ता. बारामती) याच्यावर कठोर कारवाई केली व त्याला महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, हातभट्टीवाले व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्याप्रकरणी एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे.
पोलिस अधीक्षकांकडून आलेल्या प्रस्तावाची छाननी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आरोपीस एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, साहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार, पोलिस अंमलदार महेश बनकर, सागर देशमाने व विकास खाडे यांनी ही कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.