पुणे

बारामती पोटनिवडणुकीसाठी ३ लाख ८३ हजार मतदार

CD

बारामती, ता. १२ : बारामती (२०१) विधानसभा मतदारसंघाच्या आगामी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण करून अंतिम मतदार यादी मंगळवारी (ता. १०) प्रसिद्ध करण्यात आली. या अंतिम यादीनुसार मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या ३ लाख ८३ हजार ७६७ इतकी झाली आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार बारामती विधानसभा मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. यानंतर ९ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात आल्या. प्राप्त अर्जांची छाननी करून आवश्यक दुरुस्त्या केल्यानंतर अंतिम मतदार यादी १० मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आली.
अंतिम यादीनुसार पुरुष मतदारांची संख्या १ लाख ९३ हजार ४९६, महिला मतदारांची संख्या १ लाख ९० हजार २७१, तर इतर मतदारांची संख्या २४, असून एकूण मतदारसंख्या ३ लाख ८३ हजार ७६७ इतकी आहे. यापूर्वी २० ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीत एकूण मतदारसंख्या ३ लाख ६० हजार ६०८ इतकी होती. तर ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत ३ लाख ८८ हजार ३७१ मतदारांची नोंद होती.
सदर अंतिम मतदार यादी नागरिक व राजकीय पक्षांसाठी पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० मधील तरतुदीनुसार १५ दिवसांच्या आत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे यांच्याकडे अपील दाखल करता येईल, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs MI Live: मुंबई इंडियन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड! चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ढेपाळले, पण जगात चमकले; भारतीय संघालाही हे नाही जमले...

Success Story : जिद्दीला सलाम! दोन मुलांचा सांभाळ अन् मोलमजुरी करत निशाने केली 12वी उत्तीर्ण; मिळवले ६८.३३% गुण

Judge Suicide: धक्कादायक! न्यायाधीशांनी जीवन संपवलं; मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, घटनेनं खळबळ

Yerla River Incident : लग्नासाठी आली अन् काळानं घाला घातला! येरळा नदीत पोहण्यास गेलेल्या 20 वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू; सात मुलांना पाण्याबाहेर काढण्यात यश

CSK vs MI Live: पुण्याच्या पोराने कमाल केली! आधी अफलातून झेल टिपला, नंतर सूर्यकुमार यादवची विकेट घेत दिला तगडा झटका Video

SCROLL FOR NEXT