बारामती, ता. १२ : येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंतराव चव्हाण सेंटर, ठाकरसी ग्रुप व सिकोर एड्स यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष शहर कार्यालयात कर्णबधिर मुलांसाठी श्रवणयंत्र पूर्वतपासणी व वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत एकूण १५८ लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली, तर ३१४ श्रवणयंत्रांचे वितरण करण्यात आले. कर्णबधिर मुलांना ऐकण्याची संधी मिळावी व त्यांच्या आयुष्यात नवा आनंद निर्माण व्हावा, या उद्देशाने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
या प्रसंगी सतीश खोमणे, राजेंद्र जगताप, वनिता बनकर, नगरसेविका आरती शेंडगे-गव्हाळे, गणपत देवकाते, पैगंबर शेख, प्रशांत बोरकर, ॲड. बळवंत बेलदार, प्रियांका शेंडकर, अमीर मुलाणी, विनायक शेळके, विठ्ठल करे, धनराज निंबाळकर यांच्यासह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
14631
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.